बांगलादेश संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर (Bangladesh tour of Newzealand) आहे. या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना १ जानेवारी ते ५ जानेवारी दरम्यान (NZ vs Ban 1st test) पार पडला. या सामन्यात नव्या वर्षाची चांगली सुरुवात करत बांगलादेश संघाने न्यूझीलंड संघावर ८ गडी राखून विजय मिळवला आहे(Bangladesh won by 8 wickets). यासह बांगलादेश संघाने वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात इतिहास रचला आहे.
न्यूझीलंड संघाने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या हंगामात जेतेपद मिळवले होते. आता विश्वविजेत्या (world test championship final) संघाला बांगलादेश संघाने वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात पराभूत केले आहे. तब्बल ५ वर्ष १७ कसोटी सामने उलटून गेल्यानंतर न्यूझीलंड संघ पहिल्यांदाच मायदेशात पराभूत झाला आहे.
तसेच बांगलादेश संघासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण बांगलादेश संघाने यापूर्वी न्यूझीलंडमध्ये वनडे, टी२० आणि कसोटी क्रिकेटमध्ये एकही सामना जिंकला नव्हता. हा बांगलादेश संघाचा पहिलाच विजय आहे.
First ever Test win for Bangladesh over New Zealand pic.twitter.com/JQxH3Y6L8Y
— Sarang Bhalerao (@bhaleraosarang) January 5, 2022
न्यूझीलंड संघ हा ६ वा संघ आहे, ज्याच्याविरुद्ध कसोटी क्रिकेट खेळताना बांगलादेश संघाने विजय मिळवला आहे. बांगलादेश संघाने गेल्या काही महिन्यांपासून अप्रतिम कामगिरी केली आहे. त्यांनी आतापर्यंत झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज, इंग्लंड, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघाविरुद्ध विजय मिळवला आहे.
Bangladesh Team dressing room celebrations following the historic win at Mount Maunganui.#BCB #cricket #BANvsNZ pic.twitter.com/78pGFQ30wP
— Bangladesh Cricket (@BCBtigers) January 5, 2022
गेल्या १० वर्षात असा कारनामा करणारा आशियातील पहिलाच संघ
तसेच बांगलादेश संघाने हा विजय मिळवत आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. बांगलादेश संघ न्यूझीलंड संघाला न्यूझीलंडमध्ये पराभूत करणारा गेल्या १० वर्षातील आशियातील एकमेव संघ ठरला आहे.
न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ३२८ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये डेवोन कॉनवेने सर्वाधिक १२२ धावांची खेळी केली होती. प्रत्युत्तरात बांगलादेश संघाने सर्वाधिक ४५८ धावांचा डोंगर उभारला होता. ज्यामध्ये कर्णधार मोनिमूल हकने सर्वाधिक ८८ धावांची खेळी केली होती. यासह बांगलादेश संघाने सामन्यात मोठी आघाडी घेतली होती.
तसेच दुसऱ्या डावात बांगलादेश संघातील गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली. ज्यामुळे न्यूझीलंड संघाचा संपूर्ण डाव अवघ्या १६९ धावांवर संपुष्टात आला. दरम्यान बांगलादेश संघाला विजयासाठी अवघ्या ४० धावांची आवश्यकता होती. हे आव्हान बांगलादेश संघाने २ गडी गमावून पूर्ण केले. यासह न्यूझीलंडमध्ये आपला पहिला विजय मिळवला. बांगलादेशकडून या सामन्यात इबादत हुसैनने सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन केले. त्याने पहिल्या डावात १ आणि दुसऱ्या डावात ६ विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या –
जेव्हा रवी शास्त्रींनी सिडनीत ९ तास फलंदाजी करत साकारली होती द्विशतकी खेळी, पाहा व्हिडिओ
पहिल्या वनडेला एक्कावन्न वर्षे पूर्ण! वाचा ‘त्या’ ऐतिहासिक सामन्याबाबत काही रंजक गोष्टी
वाढदिवस विशेष : परदेशात भारतीय संघाला पहिली कसोटी मालिका जिंकून देणारा कर्णधार
व्हिडिओ पाहा – संघाला कठीण परिस्थितीतून सावरणारे ५ गोलंदाज