---Advertisement---

Asian Gamesमध्ये पाकिस्तानची लईच वाईट अवस्था, कांस्य पदकाच्या सामन्यात बांगलादेशने अखेरच्या चेंडूवर लोळवलं

Bangladesh
---Advertisement---

आशियाई क्रीडा स्पर्धा 2023मधील टी20 क्रिकेटमधील कांस्य पदकाचा सामना शनिवारी (दि. 07 ऑक्टोबर) पार पडला. हा सामना बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान संघात चीनच्या हांगझोऊ येथे पार पडला. या सामन्यात बांगलादेशने अखेरच्या चेंडूवर  पाकिस्तानचा धुव्वा उडवला. बांगलादेशने हा सामना 6 विकेट्सने जिंकला. यासह बांगलादेश कांस्य पदकाचा मानकरी ठरला. तसेच, पाकिस्तानवर पदकाविना स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की ओढवली. विशेष म्हणजे, पाकिस्तानचा पुरुष आणि महिला संघ टी20 क्रिकेटमध्ये या स्पर्धेत पदकाविना राहिला. (bangladesh beat pakistan and clinch bronze medal of asian games 2023)

या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. तसेच, पाकिस्तानला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. यावेळी पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 5 षटकात 1 विकेट गमावत 48 धावा केल्या. यावेळी बांगलादेशला डकवर्थ लुईस नियमानुसार 5 षटकात 65 धावांचे आव्हान मिळाले. या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तान संघाने 5 षटकात 4 विकेट्स गमावत 65 धावा करत 6 विकेट्सने सामना जिंकला.

रकिबुलचा विजयी चौकार
यावेळी बांगलादेशकडून यासिर अली याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 16 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 34 धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त सलामीवीर अफीफ होसेन यानेही 11 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 20 धावा केल्या. तसेच, रकिबुल हसन यानेही नाबाद 4 धावांचे योगदान दिले. विशेष म्हणजे, रकिबुलच्या चौकारामुळेच बांगलादेश विजयी झाला.

यावेळी पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना अर्शद इकबाल याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त सुफियान मकीम याने 1 विकेट घेतली.

पाकिस्तानचा डाव
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाकडून सलामीवीर मिर्झा बेग याने 18 चेंडूत नाबाद 32 धावांची सर्वोच्च खेळी साकारली. त्याच्या खेळी 2 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त खुशदील यानेही 14 धावांचे योगदान दिले, तर उमर युसूफ 1 धावेवर नाबाद राहिला.

यावेळी बांगलादेशकडून गोलंदाजी करताना रकिबुल हसन याला फक्त 1 विकेट घेता आली. विशेष म्हणजे, यापूर्वी शुक्रवारी (दि. 06 ऑक्टोबर) झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात अफगाणिस्ताने पाकिस्तानला 4 विकेट्सने नमवले होते.

हेही वाचा-
विश्वचषक 2003मध्ये 7 षटकात 67 धावा ते 2011ला 3 मेडन ओव्हर टाकणाऱ्या झहीरचा 45वा बड्डे, खास गोष्टी वाचा
सागरिकाबरोबर लग्न होण्यापूर्वी ‘या’ अभिनेत्रीसोबत झहीर खानचे तब्बल 7 वर्षे होते प्रेमसंबंध!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---