विद्यार्थी आंदोलन आणि त्यानंतर बांग्लादेशातील सत्तापालटानंतर बांग्लादेश क्रिकेट बोर्डात (बीसीबी) बदलाची हलचाल सुरू झाली आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमुल हसन यांनी राजीनामा देण्याची शक्यता बळावली आहे, कारण बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी 15 ऑगस्ट रोजी बोर्डात सुधारणा करण्यासाठी सरकारसोबत काम करण्यास तयार असल्याचे सांगितले होते.
नजमुल हसन हे चौथ्यांदा बीसीबीचे अध्यक्ष आहेत. हसन अली पत्नीसह लंडनमध्ये लपून बसला आहे. देशात सुरू असलेले विद्यार्थी आंदोलन आणि राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर ते सुरक्षित स्थळी गेले आहेत. दरम्यान, माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी संबंध असलेले इतर अनेक प्रमुख संचालकही लपून बसले आहेत.
14 ऑगस्ट रोजी ढाका येथे झालेल्या बैठकीत, काही बीसीबीच्या संचालकांनी बोर्ड सुधारण्याच्या दिशेने पुढील मुद्यांवर चर्चा केली. नजमुल हसन यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली. बीसीबीच्या एका संचालकाने सांगितले- “आमच्या एका संचालकाने नजमुल हसनशी संपर्क साधला आहे. त्यांनी सांगितले की, सरकारला सहकार्य करण्यास आणि गरज पडल्यास पायउतार होण्यास तयार आहे.”
दुसऱ्या संचालकानेही याला दुजोरा दिला आणि ते म्हणाले की, जर हे मंडळ निवडून आलेल्या संस्थेच्या अंतर्गत चालवले जात असेल तर त्यांना अंतरिम सरकारचे पूर्ण सहकार्य हवे आहे. अलीकडेच, क्रीडा सल्लागार आसिफ महमूद यांनी बीसीबी अधिकाऱ्यांची भेट घेतली की बोर्ड आयसीसीच्या नियमांनुसार अंतरिम प्रमुखाची नियुक्ती करू शकते का. सध्याच्या बोर्डाचा कार्यकाळ ऑक्टोबर 2025 पर्यंत असल्याने, संचालकांना काळजी आहे की राजीनाम्याचा परिणाम यावर्षी ऑक्टोबरमध्ये बांग्लादेशमध्ये होणाऱ्या महिला टी20 विश्वचषकावर होऊ शकतो.
सध्या बोर्डाच्या कारभाराबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत, त्यात अंतरिम बोर्डाची शक्यता आणि आयसीसीकडून संभाव्य कारवाईचाही समावेश आहे. संचालक म्हणाले की, घटनेत अंतरिम मंडळाची तरतूद नाही, पण अंतरिम निवडणुका घेण्याची तरतूद आहे.
हेही वाचा-
पाहा 3 क्रिकेटपटू ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी ऑलिम्पिकमध्ये घेतला भाग, स्टार खेळाडूच्या भावाचा सामवेश
कोहली नाही, हा 33 वर्षीय खेळाडू सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडणार! रिकी पाँटिंगचा धक्कादायक अंदाज
24 वर्षीय गोलंदाजासमोर अफ्रिकन संघ ढेपाळला, शामर जोसेफची ऐतिहासिक कामगिरी