---Advertisement---

शाकिबनंतर आता हा अनुभवी क्रिकेटपटू निवृत्तीच्या वाटेवर; भारताविरुद्ध खेळणार शेवटचा सामना

Mahmudullah and Towhid Hridoy
---Advertisement---

शाकिब अल हसनने निवृत्ती जाहीर करून फक्त 2 आठवडे झाले आहेत. आता त्याच्यानंतर महमुदुल्लाही भारत विरुद्ध बांग्लादेश टी20 मालिकेनंतर निवृत्तीची घोषणा करू शकतो. एका मीडिया रिपोर्टनुसार, बांग्लादेश क्रिकेट बोर्डाच्या (बीसीबी) अधिकाऱ्याने दावा केला आहे की, महमुदुल्लाह भारत-बांग्लादेश टी20 मालिकेनंतर या फाॅरमॅटच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेईल.

महमुदुल्लाहने टी20 विश्वचषक 2024 नंतर एकही टी20 सामना खेळलेला नाही. पण 6 ऑक्टोबरपासून भारताविरुद्ध सुरू होणाऱ्या मालिकेत तो परतला. आता अहवालात असा दावा करण्यात आला आहे की महमुदुल्लाह कोणताही ब्रेक घेत नसून त्याला त्याची टी20 कारकीर्द संपवायची आहे. भारताविरुद्धच्या सध्याच्या मालिकेदरम्यान किंवा ती संपल्यानंतर तो या फॉरमॅटमधून निवृत्ती घेऊ शकतो.

काही दिवसांपूर्वीच बांगलादेशचा महान अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनने टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाल्यास तो दीर्घ स्वरूपातील शेवटचा सामना असेल, असेही तो म्हणाला. जर शाकिब तो सामना खेळला नसता तर भारताविरुद्धची कानपूर कसोटी हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना मानला जाईल, असे त्याने सांगितले.

भारताविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात महमुदुल्लाला केवळ 1 धाव करता आली होती. जर आपण त्याच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर, महमुदुल्लाला अष्टपैलूची भूमिका बजावत, त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 139 सामने खेळले, ज्यामध्ये त्याच्या नावावर 2,395 धावा आहेत. त्याने क्रिकेटच्या या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये 40 विकेट्सही घेतल्या आहेत. त्याने जवळपास 17 वर्षे टी20 क्रिकेटमध्ये आपल्या देशाचे (बांग्लादेश) प्रतिनिधित्व केले आहे.

हेही वाचा-

टीम इंडियासाठी आनंदाची बातमी; कर्णधार हरमनप्रीतच्या फिटनेसबाबत महत्त्वाचे अपडेट समोर
ind vd nz; कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा, अनुभवी खेळाडू पहिल्याच सामन्यातून बाहेर, मोठे कारण समोर
ऑस्ट्रेलियाचा एकतर्फी विजय, न्यूझीलंडचा दारुण पराभव; भारताला फायदा?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---