बांगलादेश संघ सध्या दोन कसोटी आणि तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाटी वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. कसोटी मालिकेत यजमान वेस्ट इंडीजने पाहुण्या बांगलादेशला क्लीन स्वीप (२-०) दिला. . यानंतर टी-२० मालिकेतील पहिला सामना २ जुलैला खेळला जाणार होता, पण त्यापूर्वी बांगलादेशी खेळाडूंचे खूपच हाल झाले.
उभय संघातील पहिला टी-२० सामना खेळण्यासाठी बांगलादेशचा संघ समुद्री मार्गाने सेंट लुसियावरून डोमिनिकाला पोहोचला. हा पाच तासांचा समुद्री प्रवास बांगलादेशच्या खेळाडूंना कधीच विसरता येणार नाही. जेव्हा संघ डोमिनिकाला पोहोचला, तेव्हा त्यांच्यापैकी अनेकांच्या तब्येती बिघडल्या होत्या. काही खेळाडूंनी संपूर्ण प्रवासात उलट्या केल्या. बांगलादेशी खेळाडूंनी यापूर्वी कधीच एवढ्या लहान बोटीमध्ये एवढा मोठा प्रवास केला नव्हता.
बांगलादेशच्या एका वृत्तपत्राने याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. वृत्तानुसार, बोट समुद्रात आतमध्ये गेल्यानंतर मोठ-मोठ्या लाटा सुरू झाल्या. खेळाडू ज्या बोटीवर सवार होते, ती खूप लहान असल्यामुळे या ६ ते ७ फूट लांब लाटांना सामोरे जाणे त्यांच्यासाठी खरच अवघड गोष्ट होती. परिणामी खेळाडूंना उल्टी आणि इतर त्रास होऊ लागला. माहितीनुसार वेगवान गोलंदाज शोरिफुल इस्लाम आणि यष्टीरक्षक फलंदाज नफीस इकबाल यांना सर्वात जास्त त्रास झाला.
वृत्तपत्राशी बोलताना बांगलादेशच्या एका खेळाडूने सांगितले की, एक वेळ अशी आली होती की, त्यांना वाटू लागले होते, आपण जिवंत राहणार नाही. बांगलादेशचा एक खेळाडू म्हणाला की, “या प्रवासात आम्ही आजारी पडू शकत होतो आणि मरूही शकत होतो. त्यांना (वेस्ट इंडीज) काहीच झाले नसते. मी अनेक देशांची यात्रा केली आहे, पण असा अनुभव पहिल्यांदाच आला आहे. आमच्यातील कोणत्याच खेळाडूला याची सवय नाहीये. खेळण्याचे विसरा, आमच्यातील प्रत्येकजण आजारी पडला असता, तर काय झाले असते. हा माझ्या आयुष्यातील सर्वात खराब दौरा आहे.”
दरम्यान, शनिवारी सुरू होणाऱ्या या टी-२० मालिकेचा पहिला सामना खराब वातारणामुळे वेळेत सुरू होऊ शकला नाही. मालिकेतील दोन सामने डोमिनिका आणि तिसरा सामना गयानामध्ये खेळला जाईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
सिराजच्या जादूई चेंडूने मुळापासून उखडला ‘रूट’, बघा कसा बाद झाला इंग्लंडचा हुकमी एक्का!
जडेजाचे शतक अन् बुमराहची फटकेबाजी! वाचा सामन्याच्या दुसऱ्या दिवशी काय काय घडलं
बुमराहचे धमाकेदार प्रदर्शन पाहून ब्रॉडला नव्हता बसत विश्वास, पाहा कशी होती रिएक्शन