भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना आजपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. टीम इंडिया नोव्हेंबर 2021 नंतर प्रथमच या स्टेडियमवर खेळत आहे. त्यामुळे या सामन्यासाठी चाहते मोठ्या संख्येनं आपापल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी आले आहेत.
दरम्यान, स्टेडियममधून हिंसाचाराचा एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये काही भारतीय चाहत्यांनी मिळून एका बांगलादेशी चाहत्याला मारहाण केली. या मारहाणीत हा चाहता जखमी झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.
ही घटना बांगलादेश संघाचा प्रसिद्ध समर्थक ‘टायगर रॉबी’सोबत घडली. तो आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी ढाकामधून आला आहे. तो कानपूर स्टेडियमच्या स्टँडवर उपस्थित होता. यावेळी त्याची काही भारतीय चाहत्यांशी झटापट झाली. वृत्तानुसार, भारतीय चाहत्यांनी मिळून रॉबीला धक्काबुक्की केली आणि त्याच्याकडून बांगलादेशचा ध्वजही हिसकावून घेतला. यावेळी त्यानं विरोध करण्याचा प्रयत्न केला असता भारतीय समर्थकांनी त्याला मारहाण केली. हे प्रकरण शांत करण्यासाठी इतर लोकांना मध्यस्थी करावी लागली.
यानंतर स्टेडियममध्ये उपस्थित पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी रॉबीला सोडवलं. त्याला रुग्णालयात नेण्यात आलं आहे. मात्र त्याला काही गंभीर दुखापत झाली आहे की नाही, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. आता स्थानिक पोलीस या घटनेतील दोषींवर काय कारवाई करतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र अशा घटनांमुळे भारताचं नाव कलंकित होतं, हे मात्र नक्की. तुम्ही या घटनेचा व्हिडिओ येथे पाहू शकता.
Bangladeshi fan Tiger Roby was beaten by some people.
– The Kanpur police took him to the hospital. pic.twitter.com/F3ZwKqvarM
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 27, 2024
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियानं आपल्या प्लेइंग 11 मध्ये कोणताही बदल केला नाही, तर बांगलादेशच्या संघात दोन बदल होते. ‘मेन इन ब्लू’नं मालिकेतील पहिला सामना 280 धावांनी जिंकला होता. आता भारत दुसरा सामनाही जिंकून मालिकेत क्लीन स्वीप करण्याचा प्रयत्न करेल.
हेही वाचा –
अजबच! कानपूरमध्ये चाहत्यांच्या संरक्षणासाठी लंगूरची मदत! काय आहे प्रकरण?
यशस्वी जयस्वालचा खतरनाक झेल, फलंदाज-गोलंदाज कोणाचाच विश्वासच बसेना! VIDEO पाहाच
ग्राऊंड स्टाफही विराट कोहलीचे जबरे फॅन! मनाला स्पर्श करणारा व्हिडिओ व्हायरल