ताजुल इस्लामच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर बांगलादेशने वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत क्लीन स्वीप केला. डावखुरा फिरकी गोलंदाज ताजुलने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ५ बळी घेतले. त्याने कारकिर्दीत प्रथमच हा पराक्रम केला. यादरम्यान त्याच्या ४४ चेंडूत विंडीजच्या फलंदाजांना एकही धाव करता आली नाही. प्रथम खेळताना वेस्ट इंडिजचा संघ १७८ धावांत गारद झाला. प्रत्युत्तरात पाहुण्या बांगलादेशने ४८.३ षटकांत ६ गडी राखून लक्ष्य गाठले. अशाप्रकारे त्याने मालिका ३-० अशी खिशात घातली. चमकदार कामगिरी करणारा ताजुल सामनावीर ठरला. कर्णधार तमीम इक्बालला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. याआधी वेस्ट इंडिजने टी-२० मालिका २-० ने जिंकली होती, मात्र एकदिवसीय सामन्यांमध्ये संघाला चांगली कामगिरी करता आली नाही.
नाणेफेक गमावल्यानंतर विंडीज संघाला फलंदाजीची संधी मिळाली. संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली आणि त्यांनी १६ धावांत ३ विकेट गमावल्या. यानंतर कर्णधार निकोलस पूरन आणि कार्टीने अर्धशतकी भागीदारी करत संघाला ताब्यात घेतले. अखेर रोमारिया शेफर्डने १९ धावा करत धावसंख्या १८० च्या जवळ नेली. संपूर्ण संघ ४८.४ षटकांत १७८ धावांत गारद झाला. पूरनने १०९ चेंडूत ७३ धावा केल्या. ४ चौकार आणि २ षटकार मारले. कार्टीनेही ६६ चेंडूत ३३ धावांचे योगदान दिले. रोव्हमन पॉवेलनेही १८ धावा केल्या.
लिटन दासने अर्धशतक ठोकले
प्रत्युत्तरात बांगलादेशचा नजमुल सँतो एक धावा काढून बाद झाला. यानंतर कर्णधार तमीम इक्बाल आणि लिटन दास यांनी संघाची धुरा सांभाळली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ५० धावा जोडल्या. तमिम ५२ चेंडूत ३४ धावा काढून बाद झाला. त्याचवेळी लिटनने ६५ चेंडूत ५० धावा केल्या. संघाने १४७ धावांत ६ विकेट गमावल्या. मात्र यानंतर नुरुल हसन आणि मेहदी हसन यांनी संघाला आणखी धक्का बसू दिला नाही. नुरुल ३८ चेंडूत ३२ आणि मेहदी ३५ चेंडूत १६ धावा करून नाबाद राहिला.
दरम्यान, बांगलादेशने वेस्ट इंडिजविरुद्धची सलग चौथी वनडे मालिका जिंकली आहे. या दोघांमध्ये आतापर्यंत ११ द्विपक्षीय मालिका खेळल्या गेल्या आहेत. बांगलादेशने ६ आणि वेस्ट इंडिजने ५ जिंकले आहेत. या काळात बांगलादेशने ३ मालिकांमध्ये क्लीन स्वीप केला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हुश्श! अखेर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात कोहलीला ‘विराट’ खेळ करण्याची संधी, वाचा इतिहास
प्रसिद्ध आऊट, लॉर्ड इन?, तिसऱ्या सामन्यात टीम इंडियामध्ये होणार महत्वाचे बदल
तब्बल ३२ वर्षांनंतर वाढणार भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचा रोमांच, २०२३-२७ पर्यंत असा असेल कार्यक्रम