---Advertisement---

ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटीसाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया

On: शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2019 12:49 PM
---Advertisement---

आजपासून (22 नोव्हेंबर)  इडन गार्डन, कोलकाता येथे भारत विरुद्ध बांगलादेश संघातील दिवस-रात्र कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी भारतीय संघाने 11 जणांच्या संघात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे इंदोर कसोटीत बांगलादेश विरुद्ध खेळलेला 11 जणांचा भारतीय संघच या सामन्यातही खेळणार आहे.

तसेच बांगलादेशने या सामन्यासाठी त्यांच्या 11 जणांच्या संघात 2 बदल केले आहेत. त्यांनी या सामन्यासाठी नाईम हसन आणि अल-अमीन हुसेन यांना संधी दिली आहे.

हा भारत आणि बांगलादेशचा कसोटी क्रिकेट इतिहासातील पहिलाच कसोटी सामना आहे. त्यामुळे या सामन्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

या सामन्यासाठी बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित आहेत. त्याचबरोबर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरही या सामन्यासाठी इडन गार्डनवर उपस्थित आहे.

https://twitter.com/BCCI/status/1197772893209292800

असे आहेत 11 जणांचे संघ –

भारत – मयंक अगरवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, वृद्धिमान सहा (यष्टीरक्षक), उमेश यादव, आर अश्विन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा.

बांगलादेश – शादमन इस्लाम, इमरुल कायस, मोमीनुल हक (कर्णधार), मोहम्मद मिथुन, मुशफिकुर रहीम, महमुदुल्ला, लिटन दास (यष्टीरक्षक), नाईम हसन, अबू जायेद, अल-अमीन हुसेन, एबादत हुसेन

https://twitter.com/Maha_Sports/status/1197725158389084161

https://twitter.com/Maha_Sports/status/1197553338813796352

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---