---Advertisement---

सेमीफायनलमधून बाहेर पडलेल्या बांगलादेशने दिल्लीत जिंकला टॉस, लंकेने केले 2 तगडे बदल; पाहा Playing XI

On: सोमवार, नोव्हेंबर 6, 2023 1:41 PM
BAN-vs-SL
---Advertisement---

विश्वचषक 2023 स्पर्धा दिवसेंदिवस रंजक होत आहे. विश्वचषकातील आतापर्यंत 37 सामने पार पडले आहेत. तसेच, स्पर्धेचा 38वा सामना सोमवारी (दि. 06 नोव्हेंबर) बांगलादेश विरुद्ध श्रीलंका संघात खेळला जाणार आहे. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर पार पडणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन याने जिंकली असून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यात बांगलादेश संघात एक बदल आहे. मुस्ताफिजूर रहमानची तब्येत ठीक नसल्यामुळे त्याच्या जागी तंजीम शाकिबची एन्ट्री झाली आहे. तसेच, श्रीलंका संघात दोन बदल आहेत. कुसल परेरा आणि धनंजय डी सिल्वा संघात परतले आहेत.

स्पर्धेतील कामगिरी
बांगलादेश आणि श्रीलंका (BAN vs SL) संघांची विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेतील कामगिरी पाहायची झाली, तर बांगलादेश संघाची स्थिती खूपच खराब आहे. कारण, बांगलादेश हा स्पर्धेबाहेर होणारा पहिला संघ आहे. त्यांनी आतापर्यंत 7 सामने खेळले असून त्यात फक्त 1 सामना जिंकला आहे. तसेच, 6 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. ते 2 गुणांसह पॉईंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानी आहेत.

दुसरीकडे, श्रीलंका संघाने स्पर्धेत 7 सामने खेळले आहेत. त्यात त्यांना 2 सामन्यात विजय, तर 5 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. ते 4 गुणांसह पॉईंट्स टेबलमध्ये सातव्या स्थानी आहेत. अशात या सामन्यात श्रीलंका संघ विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. (Bangladesh have won the toss and have opted to field against Sri Lanka)

विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 38व्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
बांगलादेश
तंजीद हसन, लिटन दास, नजमुल हुसेन शांतो, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), महमुदुल्ला, शाकिब अल हसन (कर्णधार), तौहीद ह्रदोय, मेहदी हसन मिराझ, तंजीम हसन साकिब, तस्कीन अहमद, शोरिफुल इस्लाम

श्रीलंका
पथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक/कर्णधार), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, महीश थीक्षणा, दुष्मंथा चमीरा, कसून रजिथा, दिलशान मदुशंका

हेही वाचा-
‘भारत विरुद्ध आख्खं जग…’, दक्षिण आफ्रिकेच्या नांग्या ठेचल्यानंतर पाकिस्तानातून आली मोठी प्रतिक्रिया
‘तर रोहित शर्माने 20 सिक्स मारले असते’, दक्षिण आफ्रिकेला डिवचत शोएब अख्तरचे मोठे विधान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---