भारतीय संघ विश्वचषक 2023 स्पर्धेत रविवारी (5 नोव्हेंबर) आपला आठवा सामना खेळला. या सामन्यात भारतापुढे दक्षिण आफ्रिका संघाचे आव्हान होते. उभय संघ कोलकाता येथील ऐतिहासिक इडन गार्डन्स येथे आमनेसामने आलेले. भारतीय संघाने विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर 327 धावा उभारल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतीय गोलंदाजां पुढे हतबल दिसला. भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला केवळ 83 धावांवर सर्वबाद करत 243 धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारतीय संघाचा हा स्पर्धेतील सलग आठवा विजय ठरला.
(India Beat South Africa By 243 Runs India Registerd 8th Consecutive Wins In 2023 ODI World Cup)
हेही वाचा-
अवघ्या आठ डावांमध्ये विराटची मोठी मजल, फक्त सचिन आणि रोहितला जवलेली कामगिरी दाखवली करून
तो आला आणि विक्रम मोडून गेला! श्रेयसने 77 धावांची खेळी करताच सचिनचा ‘तो’ Record उद्ध्वस्त