भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ वनडे विश्वचषक 2023च्या 37व्या सामन्यात एकमेकांविरुद्ध खेळत आहेत. कोलकाता स्थित ईडन गार्डन स्टेडियमवर आयोजित केला गेला. रोहित शर्मा याने संघाला वेगवान सुरुवात करून दिली. पुढे विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्यात मोठी भागीदारी पार पडली. विराटने यादरम्यान, वनडे विश्वचषक 2023 मध्ये वैयक्तिक 500 धावांचा टप्पा पार केला.
विराट कोहली (Virat Kohli) याने वनडे विश्वचषक 2023 (World Cup 2023) हंगामात सुरुवातीच्या आठ सामन्यांमध्येच 500 धावांचा टप्पा पार केला आहे. भारतासाठी चालू विश्वचषक हंगामात अशी कामगिरी करणारा विराट कोहली पहिलाच फलंदाज आहे. तसेच एकंदरीत विचार केला, तर विराट कोहली विश्वचषकात 500 धावांचा टप्पा पार करणारा तिसरा खेळाडू आहे. याआधी सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा यांनी विश्वचषक हंगामात 500+ धावा केल्या आहेत. रोहितने 2019 विश्वचषकात, तर सचिनने 2003 आणि त्याआधी 1196 विश्वचषकात संघासाठी हे महत्वाचे योगदान दिले होते.
भारतासाठी वनडे विश्वचषक हंगामात 500+ धावा करणारे फलंदाज
673 – सचिन तेंडुलकर (2003)
648 – रोहित शर्मा (2019)
523 – सचिन तेंडुलकर (1996)
520* – विराट कोहली (2023)
दरम्यान, उभय संघांतील या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी संघासाठी सलामीवीराची भूमिका पार पाडली. रोहितने 24 चेंडूत 40 धावा केल्या. शुबमन गिल 24 चेंडूत 23 धावा करून विकेट गमावली. श्रेयस अय्यर याने 87 चेंडूत 77 धावांची खेळी केली. (IND vs SA Indians to score 500+ in a single World Cup:)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
दक्षिण आफ्रिका – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रासी व्हॅन डर ड्युसेन, एडेन मार्करम, हेन्रीच क्लासेन, डेविड मिलर, मार्को यान्सेन, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी
महत्वाच्या बातम्या –
‘विश्वचषक विकला गेलाय!’, विराटला Not Out देताच चाहत्याचा हल्लाबोल; लगेच वाचा
सचिननंतर विराटच! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बर्थडेबॉयनेच संपवला वाद, जाणून घ्या वर्ल्डकमधील जबरदस्त आकडे