भारतीय संगाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली याच्यावर रविवारी (5 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध मोठी खेळण्याची जबाबादीर होती. तिसऱ्या क्रमांकावर विराट फलंदाजीला येण्याआधी रोहित शर्मा याने संघाला वेगवान सुरुवात दिली आणि विकेट देखील गमावली. खेळपट्टीवर आल्यानंतर अवघ्या काहीच वेळात विराट विश्वचषकात भारतासाठी एक खास कामगिरी करणारा सचिन तेंडुलकर याच्यानंतर दुसरा फलंदाज ठरला.
भारतीय संघ (Team India) विश्वचषक स्पर्धेत 2 वेळा विजेता ठरला आहे. यावर्षीचा विश्वचषक भारतात होत असल्यामुळे भारतीय संघ विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे. रविवारी (5 नोव्हेंबर) विश्वचषकातील सलग आठवा विजय मिळवण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरला. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुबमन गिल (Shubman Gill) या सलामीवीर फलंदाजांनी अनुक्रमे 40 आणि 23 धावा करून विकेट गमावल्या. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली (Rohit Sharma) फलंदाजीला आला आणि वनडे विश्वचषक स्पर्धेत 1500 धावा पूर्ण केल्या. विराट भारतासाठी सचिन तेंडुलकर याच्यानंतर वनडे विश्वचषकत 1500 धावा करणारा केवळ दुसरा भारतीय ठरला आहे. सचिन तेंडुलकर याच्या नावावर वनडे विश्वचषकात एकूण 2278 धावा केल्या आहेत.
तसेच एकंदरीत विचार केला, तर विराट विश्वचषकात 1500 धावा करणारा जगातील चौथा फलंदाज ठरला आहे. याआधी ही कामगिरी सचिन तेंडुलकरपाठोपाठ रिकी पाँटिंग (1743) आणि कुमार संगकारा (1532) यांनी केली होती. (Virat Kohli has become only the second Indian batsman to score 1500 runs in the World Cup)
वनडे विश्वचषकात 1500+ धावा करणारे फलंदाज (डाव)
सचिन तेंडुलकर – 2278 (45)
रिकी पाँटिंग – 1743 (46)
कुमार संगकारा – 1532 (37)
विराट कोहली – 1500+ (34)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
दक्षिण आफ्रिका – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रासी व्हॅन डर ड्युसेन, एडेन मार्करम, हेन्रीच क्लासेन, डेविड मिलर, मार्को यान्सेन, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी
महत्वाच्या बातम्या –
महाराजचा चेंडू कुणाला कळला! केशवच्या बॉलवर उडाल्या शुबमनच्या दांड्या, व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल शॉक
रोहितसाठी 2023 वर्ष ठरलं खास! विश्वविजेत्या कर्णधाराला मागे टाकत बनला सर्वोत्तम क्रिकेट लिडर