विश्वचषक 2023 स्पर्धेत 37 व्या सामन्यात भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघ समोरासमोर आले आहेत. गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर जाण्यासाठी या दोन्ही संघांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळतोय. असे असताना या सामन्यात भारतीय संघाच्या प्लेन इलेव्हनचा भाग नसलेल्या ईशान किशन याची चांगलीच चर्चा होत आहे.
या विश्वचषकात पहिल्या दोन सामन्यात ईशान किशन याला संधी मिळाली होती. शुबमन गिल आजारी असल्याने त्याला ही संधी दिली गेलेली. त्यानंतर तो संघातून बाहेर आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारतीय संघ खेळत असताना देखील तो 12 वा खेळाडू म्हणून भूमिका बजावतोय. या सामन्यातही तो खेळाडूंना पाणी देताना तसेच कर्णधार रोहित शर्माने पाठवलेले संदेश खेळाडूंपर्यंत पोहोचवताना दिसला. त्यानंतर सोशल मीडियावर त्याच्याबाबत अनेक मजेदार पोस्ट येऊ लागल्या आहेत.
एकाने त्याला थेट भारतीय संघाचा कबूतर म्हणून उपमा दिली आहे. तर अन्य एकाने त्याला भारतीय संघाचा मेसेंजर म्हटले.
Ishan kishan doing the role of a messenger pic.twitter.com/XVJGEAtAOg
— Satyyy (@Satyyy0006) November 5, 2023
Meanwhile Ishan Kishan😜 pic.twitter.com/PbuPE5KkSV
— newzbuzz🗞️🇮🇳 (@newzbuzz9) November 5, 2023
काहींनी त्याची तुलना एका प्रसिद्ध चित्रपटातील पात्र असलेल्या हिरा ठाकूर याच्याशी केली यासोबतच सोशल मीडिय चे नवे नवे मेसेंजर म्हणून ईशान किशन याचा वापर करू शकता असे देखील काहींनी म्हटले.
(Ishan Kishan Playing Messenger Role For Team India In ODI World Cup)
हेही वाचा-
फखर जमानच्या झंझावाती शतकाने पीसीबी अध्यक्ष खूश, केलं ‘एवढ्या’ लाखांचं बक्षीस जाहीर
CWC 23: भारताला पहिला धक्का! जबरदस्त सुरुवात करून देणाऱ्या रोहितची रबाडाने काढली विकेट