---Advertisement---

IND VS BAN; बांग्लादेशकडून नियमांचे उल्लंघन, आयसीसीकडून मोठी कारवाईची शक्यता

On: शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024 7:18 AM
---Advertisement---

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी पाहुण्यांनी दमदार सुरुवात करून रोहित शर्मा अँड कंपनीला गोत्यात आणले. एक वेळ अशी होती जेव्हा भारताने अवघ्या 34 धावांवर रोहित शर्मा, शुबमन गिल आणि विराट कोहली यांचे विकेट गमावले होते. तर 144 धावांवर संघाने एकूण 6 फलंदाज गमावले होते. मात्र यानंतर रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या विक्रमी भागीदारीने भारताचे पुनरागमन करत बांग्लादेशला बॅकफूटवर ढकलले. दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांग्लादेशलाही आयसीसीकडून शिक्षा होण्याचा धोका आहे.

प्रत्यक्षात पहिल्या दिवशी अर्धा तास अतिरिक्त खेळ करूनही बांग्लादेशचा संघ केवळ 80 षटके टाकू शकला. नियमानुसार एका दिवसात 90 षटके टाकावी लागतात. जर निर्धारित वेळेत षटके पूर्ण झाली नाहीत तर संघाला अर्ध्या तासाचा वेळ दिला जातो. मात्र बांग्लादेशने अतिरिक्त वेळेचा वापर करूनही 10 षटके कमी टाकली आहेत.

अशा परिस्थितीत आयसीसी बांग्लादेशविरुद्ध कठोर कारवाई करू शकते आणि दंड ठोठावू शकते. हा दंड त्याच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट्स तसेच मॅच फीचा असू शकतो. गेल्या महिन्यात पाकिस्तानविरुद्धच्या रावळपिंडी कसोटीत आयसीसीने स्लो ओव्हर रेटमुळे बांग्लादेश संघाला दंड ठोठावला होता. अशा दंडामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळण्याच्या संघांच्या आशांना मोठा धक्का बसू शकतो.

बांग्लादेशचे सध्या डब्ल्यूटीसीच्या पॉइंट टेबलमध्ये 45.83 टक्के गुण आहेत. संघाला आधीच 3 गुणांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर स्लो ओव्हर रेटमुळे भारताला इंग्लंडविरुद्ध 2 गुणांचा दंड ठोठावण्यात आला. या यादीत टीम इंडिया 68.52 टक्के गुणांसह अव्वल स्थानावर आहे.

हेही वाचा-

10 चौकार, 3 षटकार… दुलीप ट्रॉफीत संजू सॅमसनचा रुद्रावतार; केली इतक्या धावांची खेळी
“तू खूप मोठा प्लेयर आहेस पण..”, अश्विनचं कौतुक करताना सूर्यकुमारची गोंधळात टाकणारी पोस्ट
बांगलादेशने स्वत:च भारताला दिली पुनरागमनाची संधी, माजी सलामीवीराने सांगितली कुठे झाली चूक?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---