सध्या भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यानंतर दोन्ही संघ पुढील महिन्यात तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहेत. दरम्यान टी20 मालिकेसाठी बांगलादेश संघाची आज (29 सप्टेंबर) घोषणा करण्यात आली आहे. मेहदी हसनचे संघात पुनरागमन झाले आहे.
तत्पूर्वी शनिवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. भारत विरुद्ध बांगलादेश संघातील टी20 मालिका 6 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना ग्वाल्हेरमध्ये खेळवला जाणार आहे.
भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी मेहदी हसन मिराझला 14 महिन्यांनंतर बांगलादेशच्या टी20 आंतरराष्ट्रीय संघात परत बोलावण्यात आले आहे. 2024 च्या टी20 विश्वचषक स्पर्धेला मिराजला मुकावे लागले होते. त्याने अखेरची द्विपक्षीय मालिका जुलै 2023 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध खेळली होती. डावखुरा फिरकी गोलंदाज रकीबुल हसन आणि डावखुरा वेगवान फलंदाज परवेझ हुसेन इमॉन यांनाही माघारी बोलावण्यात आले आहे. हे दोन्ही खेळाडू विश्वचषक स्पर्धेत खेळू शकले नव्हते.
View this post on Instagram
टी20 मालिकेसाठी बांगलादेश संघ
नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तनजीद हसन तमीम, परवेझ हुसेन इमॉन, तौहीद ह्रदॉय, महमुदुल्लाह, लिटन कुमार दास, जाकेर अली अनिक, मेहदी हसन मिराज, महेदी हसन, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तस्कीन अहमद, शरीफुल इस्लाम, तनजीब हसन रकीबुल हसन.
महत्त्वाच्या बातम्या-
इशान किशनचे भारतीय संघातील पुनरागमन लांबणीवर, ‘या’ कारणामुळे मिळाले संकेत!
INDvsBAN : अभिषेक शर्मा अन् ‘या’ खेळाडूची सलामी जोडी ठरू शकते धोकादायक; माजी निवडकर्त्यांचे मत
SL vs NZ; कोण आहे हा फिरकीपटू? पदार्पण सामन्यातच घेतल्या 9 विकेट्स