श्रीलंका विरूद्ध न्यूझीलंड (Sri Lanka vs New Zealand) 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत श्रीलंकेने वर्चस्व गाजवले. श्रीलंकेने 2-0 ने मालिका आपल्या खिशात घातली. पहिल्या सामन्यात 63 धावांनी विजय मिळवला, तर दुसऱ्या सामन्यात 154 धावांनी शानदार विजय मिळवला. तत्पूर्वी या मालिकेतील दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेच्या फिरकीपटूने कहर केला. त्याने पदार्पण सामन्यातच 9 विकेट्स घेतल्या.
श्रीलंकेच्या निशान पेरिसला (Nishan Peiris) न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले होते. त्यामध्ये फिरकीची जादू दाखवत त्याने न्यूझीलंडच्या 9 फलंदाजांचा पव्हेलियनचा रस्ता दाखवला. पेरिसने सामन्याच्या पहिल्या डावात केवळ 3 विकेट्स घेतल्या होत्या, नंतर त्याने दुसऱ्या डावात जबरदस्त फॉर्म दाखवला. त्याने 6 फलंदाजांना तंबूत पाठवले. ईएसपीएनक्रिकइंफोच्या रिपोर्ट्सनुसार, निशान पेरिसने केलेली ही कामगिरी आता कसोटी पदार्पणातील श्रीलंकेच्या गोलंदाजाची तिसरी सर्वोत्तम कामगिरी आहे.
निशान पेरिसने (Nishan Peiris) प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 42 सामन्यात 181 विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान त्याच्या नावावर 13 वेळा 5 विकेट्स, तर एकदा 10 विकेट्सची नोंदही झाली होती. त्याच्या लिस्ट-ए कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने 61 सामन्यात 86 विकेट्स घेतल्या आहेत. त्याबरोबर त्याने टी20 क्रिकेटमध्ये 39 सामने खेळले आहेत आणि 43 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक वेळा 600+ धावा करणारे टाॅप-5 संघ
IPL 2025; “आरसीबी फक्त कोहलीलाच रिटेन करणार” माजी खेळाडूचे खळबळजनक वक्तव्य
SL vs NZ; कसोटीत तुटला ब्रायन लाराचा रेकाॅर्ड, गोलंदाजाने खणखणीत षटकार ठोकत टाकले मागे