बांगलादेशचा संघ दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी रविवारी (15 सप्टेंबर) भारतात दाखल झाला आहे. पाहुण्यांचा संघ चेन्नई विमानतळावरून थेट हॉटेलकडे रवाना झाला होता. यावेळी संघाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. आता बांगलादेश संघाने कसोटी मालिकेसाठी तयारी सुरू केली आहे. सोमवारी (16 सप्टेंबर) संघाने चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर जोरदार सराव केला. भारतीय संघही चेन्नईत कसोटी मालिकेसाठी तयारी करत आहे.
बांगलादेशचा आत्मविश्वास उंचावला असेल
पाकिस्तानला प्रथमच कसोटी मालिकेत पराभूत करून मैदानात उतरणाऱ्या बांगलादेश संघाचे मनोबल उंचावले असेल. अशा परिस्थितीत या संघाला आता भारताविरुद्धही इतिहास रचायचा आहे. बांगलादेशने अद्याप भारताला कसोटीत पराभूत केलेले नाही. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 13 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यातील भारतीय संघाने 11 सामने जिंकले असून 2 सामने अनिर्णित राहिले आहेत. अशा स्थितीत बांगलादेश संघ चेन्नई कसोटीत इतिहास रचण्यासाठी प्रयत्नशील असेल.
बांगलादेश क्रिकेटने सरावाचे फोटो शेअर केले
बांगलादेश क्रिकेटने एक्सवर सरावाचे काही फोटो शेअर केले आहेत. बांगलादेशच्या खेळाडूंनी गोलंदाजी, फलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणाचा सराव केल्याचे पाहायला मिळते. यासोबतच कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये बांगलादेश संघाच्या पहिल्या सराव सत्राचे फोटो.’
Snaps from the Bangladesh team’s first practice session at the M. A. Chidambaram Stadium in Chennai.
Photo Credit: Tamil Nadu Cricket Association#BCB #Cricket #INDvBAN #WTC25 pic.twitter.com/EtVhrYgyGv
— Bangladesh Cricket (@BCBtigers) September 16, 2024
कसोटी मालिकेसाठी भारत आणि बांगलादेश संघ
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल
बांगलादेश – नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास, मेहदी हसन मिराज, झाकीर अली, तस्किन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा, तैजुल इस्लाम, महमुदुल हसन जॉय, नईम हसन, खालिद अहमद
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs BAN: “भारताने सावध राहावे…” माजी खेळाडूचा भारताला सतर्कतेचा इशारा
सचिन 194 धावांवर खेळत असताना जेव्हा द्रविडने डाव केला होता घोषित, चोप्राने सांगितला तो किस्सा
टी20 विश्वचषकाच्या इतिहासात एकही सामना न जिंकू शकलेले संघ