आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेतील १५ वा सामना रविवारी (२४ ऑक्टोबर) रंगणार आहे. या सामन्यात बांगलादेश आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना शारजहा क्रिकेट स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरू होणार आहे. या दोन्ही संघांनी पात्रता फेरीतील सामन्यांमध्ये विजय मिळवून सुपर-१२ मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे या दोन्ही संघांमध्ये आणखी पुढे जाण्यासाठी चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. चला तर पाहूया कशी राहिली आहे या दोन्ही संघांची कामगिरी.
श्रीलंका आणि बांगलादेश संघांतील या दोन्ही संघातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, श्रीलंका संघ बांगलादेश संघापेक्षा पुढे आहे. विश्वचषक स्पर्धेत हे दोन्ही संघ १ वेळेस आमने सामने आले आहेत. या सामन्यात देखील श्रीलंका संघाने बाजी मारली होती. तर एकूण टी२० सामन्यांबद्दल बोलायचं झालं तर, बांगलादेश आणि श्रीलंका संघ एकूण ११ वेळेस आमने सामने आले आहेत. यापैकी श्रीलंका संघाला ७ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. तर बांगलादेश संघाने ४ सामन्यात विजय मिळवला आहे.
श्रीलंका विरुद्ध बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये श्रीलंका संघाचे पारडे जड आहे. तसेच पात्रता फेरीतील सामन्यांमध्ये श्रीलंका संघ ग्रुप एमध्ये पहिल्या स्थानी राहिला आहे. या संघाला ३ विजय मिळवण्यात यश आले होते. तर बांगलादेश संघ ग्रूप बी मध्ये स्कॉटलॅंड संघानंतर दुसऱ्या स्थानी होता. श्रीलंका संघाने नामबिया संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ७ गडी राखून आणि आयर्लंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ७० धावांनी विजय मिळवला होता. यासह नेदरलँड संघावर त्यांनी ८ गडी राखून विजय मिळवला होता.
तर दुसरीकडे बांगलादेश संघाला स्कॉटलॅंड संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. परंतु त्यानंतर जोरदार पुनरागमन करत ओमान आणि पापुआ न्यू गिनी संघाला पराभूत करत बांगलादेश संघाने सुपर -१२ मध्ये प्रवेश केला.
असे आहेत दोन्ही संघ
श्रीलंका: दासुन शनाका (कर्णधार), कुसल जनीथ परेरा, दिनेश चांदीमल, धनंजया डिसिल्वा, पथुम निसंका, चरिथ असलंका, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, चमिका करुणारत्ने, वनिन्दु हसरंगा, दुष्मंथा चमीरा, लाहिरु कुमारा, महीश थीक्षणा, अकिला धनंजय, बिनुरा फर्नांडो
बांगलादेश: महमूदुल्लाह (कर्णधार), लिटन दास, मोहम्मद नईम, महेदी हसन, शाकिब अल हसन, सौम्य सरकार, मुशफिकुर रहीम, नूरुल हसन, अफीफ हुसेन, नसुम अहमद, तस्कीन अहमद, शमीम हुसेन, मुस्ताफिजुर रहमान, मोहम्मद सैफुद्दीन.
महत्त्वाच्या बातम्या-
वन अँड ओन्ली बॉस…! मातब्बर फलंदाज गेलची क्षेत्ररक्षणात खास ‘सेंचूरी’, इंग्लंडविरुद्ध केला पराक्रम
वेस्ट इंडिज वि. इंग्लंड सामन्यापूर्वी दोन्ही देशातील खेळाडू का बसले गुडघ्यावर? कारण अभिमानास्पद
प्रतिक्षा संपली!! टी२० विश्वचषकात बारा वर्षांनंतर इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्ध साकारला पहिला विजय






