यूएई आणि ओमानमध्ये १७ ऑक्टोबर पासून टी-२० विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. सुरुवातीला या स्पर्धेतील पात्रता फेरीतील सामने पार पडले. तर २३ ऑक्टोबरपासून या स्पर्धेतील सुपर-१२ फेरीतील सामने सुरू झाले आहेत. यातील पहिल्याच दिवशी चाहत्यांना रोमांचक सामने पाहायला मिळाले. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने दक्षिण आफ्रिकेवर ५ विकेट्सने बाजी मारली. तर दुसऱ्या लढतीत वेस्ट इंडिज संघाला ६ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान हा सामना सुरू होण्यापूर्वी वेस्ट इंडीज आणि इंग्लंड संघातील खेळाडू गुडघ्यावर बसले होते. त्यांनी असे करण्यामागचे कारण काय? हा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. चला तर जाणून घेऊया.
या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर वेस्ट इंडीज संघातील सलामीवीर फलंदाज जेव्हा फलंदाजी करण्यासाठी आले, त्यावेळी पहिला चेंडू टाकण्यापूर्वी दोन्ही संघातील खेळाडू गुडघ्यावर बसले होते. त्यांनी हे वर्णद्वेष विरोधात लढा देण्यासाठी केले होते. यासह त्यांनी वर्णद्वेष विरोधात एकजूट असल्याचा देखील संदेश दिला.
या सामन्यापूर्वी जेव्हा इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गनला विचारण्यात आले की, “वेस्ट इंडिज संघाविरुद्ध होत असलेल्या सामन्यात असे का केले गेले?” याचे उत्तर देत ओएन मॉर्गन म्हणाला, “खेळाडू या मोहिमेत सहभागी झाले आहेत. राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर बदल घडवून आणण्यासाठी ही मोहीम राबवणे गरजेचे आहे.”
We respect the differences in our society, our team squad and the history our badge represents. pic.twitter.com/sIe0P3BPU4
— England Cricket (@englandcricket) October 23, 2021
England and West Indies players take the knee before ball one #T20WorldCup pic.twitter.com/d50ZuF7ODi
— Ayan (@ayan_acharya13) October 23, 2021
England and West Indies players taking a knee before the game, just like Australia and South Africa did earlier today.
All my heart ❤️
Hope others join in, sit to take a stand!#T20WorldCup pic.twitter.com/sZvs0CEHSt— Rahul Pandey (@sportstoryguy) October 23, 2021
यापूर्वी देखील वेस्ट संघाविरुद्ध द्विपक्षीय मालिका सुरू असताना इंग्लंड संघाने ‘ब्लॅक लिव्ह मॅटर्स’ मोहिमेला समर्थन केले होते. तसेच टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या सामन्यात देखील खेळाडूंनी गुडघ्यावर बसून वर्णद्वेष विरोधात एकजूट असल्याचा संदेश दिला होता. हे सर्व दीड वर्षांपूर्वीच सुरू झाले होते, जेव्हा अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयडचा पोलीस कस्टडीत मृत्यू झाला होता. त्यानंतर जगभरात ‘ब्लॅक लिव्ह मॅटर्स’ मोहिमेला सुरुवात झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
कडक झेल! वेस्ट इंडिजच्या गोलंदाजाने स्वत:च्याच चेंडूवर पकडला अद्भुत झेल, पाहून व्हाल हैराण






