---Advertisement---

हाय व्होल्टेज सामन्यापूर्वी भारत-पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये दिसला दोस्ताना, सरावासाठी मैदानात एकत्र जाताना फोटो व्हायरल

On: रविवार, ऑक्टोबर 24, 2021 1:23 AM
---Advertisement---

टी२०  विश्वचषक २०२१ मध्ये सुपर १२ फेरीला शनिवारी (२३ ऑक्टोबर) सुरुवात झाली. सुपर १२ फेरी जरी सुरू झाली असली तरी, चाहत्यांचे लक्ष भारत आणि पाकिस्तानमध्ये २४ ऑक्टोबरला खेळल्या जाणाऱ्या सामन्याकडे लागलेले आहे. भारत आणि पाकिस्तान सामन्याला आता २४ तासांपेक्षा कमी कालावधी राहिला आहे आणि दोन्ही संघ सामन्यापूर्वीच्या तयारीत आहेत.

या सामन्यापूर्वी दोन्ही संघांचे खेळाडू मैदानावर घाम गाळताना पाहायला मिळाले आहेत. तसेच सरावासाठी मैदानावर उतरण्यापूर्वी दोन्ही संघांमध्ये मैत्रीपूर्ण वातावरण पाहायला मिळाले आहे. दोन्ही संघांचे खेळाडू सरावासाठी मैदानात एकत्र जाताना दिसले आहेत.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, आयसीसी अकादमीच्या ट्रेनिंग सेशनमध्ये भाग घेताना भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये मैत्रीपूर्ण वातावरण पाहायला मिळाले आहे. वृत्तानुसार दोन्ही संघाचे खेळाडू मैदानावर सरावा करण्यासाठी एकत्रच दाखल झाले. सराव सुरु झाल्यानंतर भारतीय खेळाडूंनी फुटबॉल खेळला.

यादरम्यान कर्णधार विराट कोहली, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हे तिघे फुटबॉल खेळताना दिसले आहेत. त्यानंतर संघातील खेळाडू फुटबॉसह वॉर्मअप करतानाही दिसले आहेत. सरावासाठी नेट्समध्ये पोहोचल्यानंतर वेळ वाया न घालवता वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, टी-२० विश्वचषकसाठी भारतीय संघाच्या मेंटॉरपदी नियुक्त केला गेलेला महेंद्रसिंग धोनी आणि गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी नियोजनाला सुरुवात केलेली पाहायला मिळाली.

याबाबत माहिती ठेवणाऱ्या एका सूत्राने एएनआयशी चर्चेदरम्यान सांगितले होते की, टी२० विश्वचषक २०२१ साठी धोनीच्या मेंटॉर बनण्याने संघाला खूप फायदा होणार आहे. भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी चांगली तयारी केली आहे. भारतीय संघाने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला सराव सामन्यात एकतर्फी मात दिली आहे.

यूएईच्या या खेळपट्टीवर आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा खेळल्यामुळे भारतीय खेळाडू परिस्थितीशी चांगल्या प्रकारे परिचित आहेत आणि संघाला याचा नक्कीच फायदा मिळू शकतो. दरम्यान, आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान संघ वनडे आणि टी२० विश्वचषकात एकूण १२ वेळा आमने सामने आले आहेत आणि यामध्ये पाकिस्तानला एकदाही विजय मिळवला आला नाही. भारताचे वनडे विश्वचषकात ७ आणि टी-२० विश्वचषकात ५ विजय मिळवले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

कडक झेल! वेस्ट इंडिजच्या गोलंदाजाने स्वत:च्याच चेंडूवर पकडला अद्भुत झेल, पाहून व्हाल हैराण

आदिल राशीदच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला ‘धोकादायक’ आंद्रे रसेल, पाहा कशाप्रकारे झाला क्लीन बोल्ड

एएफसी आशियाई चषकाच्या पात्रता फेरीतील सामन्यात बलाढ्य ओमानशी भिडणार भारतीय संघ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---