इंग्लंडने टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेची सुरुवात दमदार केली आहे आणि सुपर-१२ च्या पहिल्याच सामन्यात गतविजेत्या वेस्ट इंडिजचा ८ गडी राखून पराभव केला. इंग्लंडचे लेग-स्पिनर आदिल रशीद आणि मोईन अली यांनी आपल्या फिरकीच्या जाळ्यात वेस्ट इंडिजचे फलंदाज अडकले आणि त्यांचा डाव अवघ्या ५५ धावांवर गुंडाळला. मात्र ५६ धावांचे सोपे लक्ष्य गाठताना इंग्लंडनेही ४ विकेट गमावल्या. त्यांनी ८.२ षटकांत आपले लक्ष्य गाठले. यष्टीरक्षक जोस बटलर (२४ *) ने विजयी चौकार मारला. दरम्यान, या सामन्यात वेस्टइंडिजच्या अकिल हुसेनने आपल्या अफलातून झेलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
इंग्लडच्या डावातील सातव्या षटकात अकिल हुसेनने लियाम लिव्हिंगस्टोनचा जबरदस्त झेल घेत सर्वांना चकित केले. वेस्ट इंडिजकडून सातवे षटक टाकण्यासाठी अकिल हुसेनला पाचारण करण्यात आले. षटकाच्या पहिल्या चेंडूवर उजव्या हाताचा फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोनने हुसेनने टाकलेला लेग स्पिन चेंडू टोलवण्याचा प्रयत्न केला, पण अकिल हुसेनने आपल्या डाव्या बाजूला झेप घेत अद्भुत झेल टिपला.
तत्पूर्वी, ५६ धावांचे माफक लक्ष्य गाठताना इंग्लंडच्या ४ विकेट पडल्या. इंग्लिश संघाला पहिला धक्का जेसन रॉय (११) च्या रूपात मिळाला, त्याला रवी रामपॉलने गेलकरवी झेलबाद केले. यानंतर जॉनी बेअरस्टो (९) याला अकिल हुसेनने त्याच्याच चेंडूवर झेलबाद केले, त्यामुळे संघाची धावसंख्या २ बाद ३० अशी झाली. मोईन अली (२) धावबाद झाला आणि लियाम लिव्हिंगस्टोन (१) पुन्हा हुसेनच्याच चेंडूवर झेलबाद झाला. मात्र, बटलर खेळपट्टीवर टिकून राहिला आणि संघाला विजय मिळवून दिला. विंडीज संघाकडून हुसेनने ४ षटकात २४ धावा देत २ बळी घेतले तर रामपॉलला एक विकेट मिळाली.
तत्पूर्वी, वेस्ट इंडिजचा संघ त्यांच्या दुसऱ्या सर्वात कमी टी -२० धावसंख्येवर बाद झाला. त्यांची टी२० मधील निचांकी धावसंख्या ४५ धावा अशी आहे. २०१९ मध्ये इंग्लंडविरुद्धच नोंदवली गेली होती. नेदरलँड संघाच्या ३९ आणि ४४ नंतर टी २० विश्वचषकातील ही तिसरी सर्वात कमी धावसंख्या आहे.
नाणेफेक जिंकून मोईनने गोलंदाजी कर्णधार ओएन मॉर्गनचा निर्णय योग्य सिद्ध केला. त्याने ४ षटकांत केवळ १७ धावा दिल्या. वेस्ट इंडिजसाठी फक्त ख्रिस गेल (१३) दुहेरी आकडा गाठू शकला. लेंडल सिमन्स आणि शिमरॉन हेटमायरने हात उघडण्याचा प्रयत्न केला पण मोईनने दोघांनाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. दुसऱ्या टोकाकडून ख्रिस वोक्सने किफायतशीर गोलंदाजी करत एविन लुईसला (६) बाद केले. टायमल मिल्सने गेलला बाद केले. इतर फलंदाजही काही विशेष करू शकले नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
आदिल राशीदच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला ‘धोकादायक’ आंद्रे रसेल, पाहा कशाप्रकारे झाला क्लीन बोल्ड
एएफसी आशियाई चषकाच्या पात्रता फेरीतील सामन्यात बलाढ्य ओमानशी भिडणार भारतीय संघ
‘इंशाल्लाह, पाकिस्तान भारताला नक्कीच हरवेल,’ इमरान खान यांनी व्यक्त केला विश्वास