टी२० विश्वचषक २०२१ च्या सुपर १२ फेरीला शनिवारी (२३ ऑक्टोबर) सुरुवात झाली. सुपर १२ फेरीच्या पहिल्या दिवशी वेस्टइंडीज आणि इंग्लंड यांच्यात सामना खेळला गेला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी या सामन्यात जबरदस्त प्रदर्शन केलेले पाहायला मिळाले. इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर वेस्ट इंडीज विस्फोटक फलंदाज एकापाठोपाठ एक विकेट गमावत गेले आणि त्यांचा संघ अवघ्या ५५ धावांवर सर्वबाद झाला. इंग्लंडच्या आदिल रशीदने या सामन्यात चार विकेट्स घेऊन त्यांच्या संघाला मिळालेल्या विजयामध्ये महत्वाची कामगिरी बजावली. राशीदने या सामन्यात वेस्ट इंडीजच्या आंद्रे रसेलल ज्याप्रकारे त्रिफळाचीत केले, ते अप्रतिम होते.
वेस्ट इंडीजच्या फलंदाजीवेळी इंग्लंडचा आदिल रशीद ११ व्या षटकात गोलंदाजीसाठी आला होता. त्याच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याने असा चमत्कार केला, ज्याने चाहत्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले आहेत. त्याने त्याच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर आद्रे रसेलला त्रिफळाचीत केले. त्याचा या चेंडूचा टप्पा खेळपट्टीवर पडला आणि नंतर चेंडू वेगाने फिरकी घेत स्टंप्सच्या दिशेने वळला. चेंडू टप्पा पडल्यानंतर फलंदाजाच्या पॅड आणि बॅटच्या मधून गेला आणि स्टंप्सला जाऊन लागला. त्यामुळे रसेल शुन्यावर बाद झाला.
वेस्ट इंडीजविरुद्ध सामन्यात आदिल रशीद एक केवळ २.२ षटके टाकली आणि यामध्ये अवघ्या दोन धावा देत चार विकेट्स मिळवण्याचा पराक्रम केला आहे. त्याने केलेले हे प्रदर्शन टी-२० विश्वचषकात एखाद्या इंग्लंडच्या गोलंदाजाने केलेले सर्वोत्कृष्ट प्रदर्शन ठरले आहे. रशीदने केलेल्या प्रदर्शनाच्या जोरावर इंग्लंडने वेस्ट इंडीजला अवघ्या १४.२ षटकात ५५ धावांवर सर्वाबाद केले. प्रत्युत्तरात इंग्लंडने हे लक्ष्य अवघ्या ८.२ षटकात आणि चार विकेट्सच्या नुकसानावर गाठले आणि सामन्यात सहज विजय मिळवला.
वेस्ट इंडीजने या सामन्यात केलेल्या धावा टी-२० विश्वचषकातील तिसरी सर्वात कमी धावसंख्या ठरली आहे. टी-२० विश्वचषकात सर्वात कमी धावसंख्या करण्याचा विक्रम नेदरलँडच्या नावावर आहे. त्यांनी हा विक्रम २०१४ साली श्रीलंकेविरुद्ध खेळताना स्वत:च्या नावावर केला होता. नेदरलँडने या सामन्यात केवळ ३९ धावा केल्या होत्या आणि त्यांचा संघ सर्वबाद झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
‘इंशाल्लाह, पाकिस्तान भारताला नक्कीच हरवेल,’ इमरान खान यांनी व्यक्त केला विश्वास
भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने मांडल्या ‘या’ चार महत्त्वाच्या गोष्टी