बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यात ढाका येथे झालेल्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत बांगलादेश संघाने २-१ ने विजय मिळवला आहे. मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात श्रीलंका संघाने जोरदार पुनरागमन करत ९७ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. तसेच सामन्यादरम्यान बांगलादेश आणि श्रीलंका संघातील खेळाडूंमध्ये शाब्दिक युद्ध झाल्याचे पाहायला मिळाले होते.
शोरिफुल आणि मेंडिस यांच्यात रंगले शाब्दिक युद्ध
तर झाले असे की, श्रीलंका संघ फलंदाजी करत असताना १७ वे षटक टाकण्यासाठी शोरिफुल इस्लाम गोलंदाजीला आला होता. फलंदाजी करत असलेल्या कुशल मेंडिसला शोरिफुलने ऑफकटर चेंडू टाकला. ज्यावर मेंडिसला शॉट खेळता आला नव्हता. या चेंडूनंतर शोरिफुलने फलंदाजावर अतिरिक्त दबाव बनवण्याचा प्रयत्न केला. शोरिफुलने फलंदाजाच्या दिशेने वाटचाल करत मेंडीसला काहीतरी म्हटले. त्यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये शाब्दिक युद्धाला प्रारंभ झाला होता. परंतु नंतर हा वाद आटोक्यात आला.
शोरिफुलने या सामन्यात ८ षटक गोलंदाजी केली. यात त्याला ५६ धावा खर्च करत १ गडी बाद करण्यात यश आले. तर मेंडिसला ३६ चेंडूत अवघ्या २२ धावा करता आल्या.
https://youtu.be/cFVMJOvV2k0
परेराला मिळाले जीवनदान
या सामन्यात बांगलादेश संघाने तीनही क्षेत्रात निराशाजनक कामगिरी केली. तसेच त्यांना शतकीय खेळी करणाऱ्या कुशल परेराला बाद करण्यासाठी अनेकदा संधी मिळाली. परेराने १२० धावांची खेळी केली होती. या सामन्यात चामिराला सामनावीर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर मुश्फिकुर रहिमला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. रहिमने या वनडे मालिकेत सर्वाधिक धावा केल्या आहेत.
असा झाला सामना
दरम्यान सामन्याचा विचार करायचा झाल्यास, तिसऱ्या वनडे सामन्यात श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटक अखेर २८६ धावा केल्या होत्या. यामध्ये कर्णधार कुशल परेराने १२० धावांचे योगदान दिले होते. प्रत्युत्तरात बांगलादेश संघाला ४२.३ षटकात १८९ धावाच करता आल्या होत्या. श्रीलंका संघाकडून दुष्मांथा चमीराने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत ५ गडी बाद केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
दुर्दैवच म्हणावे! WTC फायनलमध्ये ‘हा’ अंपायर भारतासाठी अनलकी, यापुर्वी ४ विश्वचषकात नडलाय
लईच ताणलं! ३ महान क्रिकेटपटू, ज्यांनी अनावश्यक आपली कसोटी कारकीर्द खेचली
‘पाकिस्तानचा प्रशिक्षक बनू, मी एवढा मूर्ख नाही!,’ खुद्द पाकिस्तानी दिग्गजाचे धक्कादायक वक्तव्य