---Advertisement---

मुस्तफिजूर प्रकरणाच्या गदारोळात संघाचा टी20 वर्ल्ड कप 2026 साठी संघ जाहीर, या खेळाडूकडे कर्णधारपद

On: रविवार, जानेवारी 4, 2026 2:28 PM
---Advertisement---

आयपीएल 2026 मधून मुस्तफिजूर रहमान बाहेर झाल्यानंतर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) मोठा निर्णय घेतला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 साठी बांगलादेशचा संघ जाहीर करण्यात आला आहे. आगामी स्पर्धेसाठी अनुभवी विकेटकीपर-फलंदाज लिटन दासकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर मोहम्मद सैफ हसन याला उपकर्णधार बनवण्यात आले आहे.

या स्पर्धेत बांगलादेशला ग्रुप-C मध्ये स्थान मिळाले आहे. बांगलादेशचा पहिला सामना दोन वेळा वर्ल्ड कप विजेत्या वेस्ट इंडीजविरुद्ध 7 फेब्रुवारी रोजी कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर होणार आहे. विशेष म्हणजे बांगलादेशचे सुरुवातीचे तीन सामने कोलकात्यातच होणार असल्याने भारतीय परिस्थितीशी जुळवून घेण्याची संधी संघाला मिळणार आहे.

जाहीर करण्यात आलेल्या संघात फलंदाजीची धुरा कर्णधार लिटन दाससह तंजीद हसन आणि परवेज हुसैन इमोन यांच्यावर असणार आहे. मधल्या फळीत तौहीद हृदोय आणि शमीम हुसैन यांच्याकडूनही संघाला मोठ्या अपेक्षा असतील.
गोलंदाजी विभागात अनुभवी मुस्तफिजूर रहमान आणि वेगवान तस्कीन अहमद यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. तर फिरकीची जबाबदारी महेदी हसन, नसुम अहमद आणि रिशाद हुसैन सांभाळतील. आशियाई परिस्थितीत हे फिरकीपटू ‘मॅच विनर’ ठरू शकतात, असा विश्वास संघ व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.

2007 पासून झालेल्या सर्व टी20 वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये बांगलादेशने सहभाग घेतला आहे. मात्र आजवर एकदाही संघाला उपांत्य फेरी गाठता आलेली नाही. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत बांगलादेशकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बांगलादेशचा टी20 वर्ल्ड कप 2026 साठी संघ:
लिटन दास (कर्णधार), मोहम्मद सैफ हसन (उपकर्णधार), तंजीद हसन, परवेज हुसैन इमोन, तौहीद हृदोय, शमीम हुसैन, नुरुल हसन सोहन, महेदी हसन, रिशाद हुसैन, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, तंजीम हसन साकिब, तस्कीन अहमद, मोहम्मद शैफुद्दीन, शोरफुल इस्लाम.

बांगलादेशचे गटातील सामने:
7 फेब्रुवारी – वेस्ट इंडीज (कोलकाता)
9 फेब्रुवारी – -इटली (कोलकाता)
14 फेब्रु”’वारी – इंग्लंड (कोलकाता)
17 फेब्रुवारी – नेपाळ (मुंबई, वानखेडे)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---