टी20 विश्वचषक (T20 World cup) अवघ्या काही तासांवरच येऊन ठेपला असून काही संघांमध्ये शेवटच्या मिनिटांपर्यंत बदल करण्यात आले. टी20 विश्वचषकाच्या संघात बदल करायचे असतील तर आयसीसीने 15 ऑक्टोबरपर्यंत मुभा दिली होती. भारतानेच जसप्रीत बुमराह याच्या जागी मोहम्मद शमी याची घोषणा 14 ऑक्टोबरला केली. बुमराह दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला तर शमी किंवा अन्य खेळाडू त्याच्याजागी येणारच होता मात्र बांगलादेश क्रिकेट बोर्डने आऊट ऑफ फॉर्म असलेल्या दोन खेळाडूंना ताबडतोब संघातून बाहेर केले आहे.
बांगलादेश क्रिकेट बोर्डने (बीसीबी) शुक्रवारी (14 ऑक्टोबर) टी20 विश्वचषकाच्या संघात बदल करत अंतिम खेळाडूंची यादी जाहीर केली. बीसीबीने त्यांच्या निवेदनात डावखुरा फलंदाज सौम्य सरकार आणि डावखुरा वेगवान गोलंदाज शोरिफुल इस्लाम यांना राखीव खेळाडूंमधून मुख्य खेळाडूंमध्ये बढती दिली आहे.
सरकार आणि शोरिफुलच्या जागी सब्बीर रहमान आणि अष्टपैलू मोहम्मद सैफुद्दी यांना आधी अंतिम पंधरामध्ये निवडले होते. तसेच बांगलादेशने 14 सप्टेंबरलाच मुख्य संघाची घोषणा केली होती. आता हे दोन्ही खेळाडू बांगलादेशला परतील किंवा ऑस्ट्रेलियामध्येच असतील याबाबत बीसीबी लवकरच निर्णय घेणार आहे.
बांगलादेशचा टी20 विश्वचषकाच्या सुपर 12मध्ये समावेश आहे. त्यामुळे त्यांचा पहिला सामना 24 ऑक्टोबरला ए2 गटातील संघाशी होणार आहे. हा सामना होबार्ट येथे खेळला जाणार आहे. त्याआधी ते अफगाणिस्तान (17 ऑक्टोबर) आणि दक्षिण आफ्रिका (19 ऑक्टोबर) विरुद्ध सराव सामने खेळणार आहे. हे दोन्ही सामने ब्रिसबेन येथे खेळले जाणार आहेत.
Bangladesh have made two changes to their #T20WorldCup squad 📋
Details 👇https://t.co/MFUPPvM5RD
— ICC (@ICC) October 14, 2022
बांगलादेश : शाकिब अल हसन (कर्णधार), नुरुल हसन, अफिफ हुसैन, इबादोत हुसेन, हसन महमूद, लिटन दास, मेहदी हसन मिराझ, मुस्तफिजुर रहमान, नजमुल हुसेन शांतो, शॉरीफुल इस्लाम, सौम्या सरकार, मुसद्देक हुसेन, नसुम अहमद, तस्किन अहमद, यासिर अली चौधरी.
राखीव: महेदी हसन, रिशाद हुसैन, सब्बीर रहमान, मोहम्मद सैफुद्दीन
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फिटनेसमध्येही विराट कोहलीचा अनोखा रेकॉर्ड! ‘या’ 23 भारतीय खेळाडूंनी केलीये एनसीएची वारी
अरे हे काय, कॅप्टन रोहितने तर पाकिस्तानविरुद्धची प्लेईंग इलेवनच सांगून टाकली!