लाहोर। पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघामध्ये गद्दाफी स्टेडियमवर कसोटी मालिकेतील तिसरा सामना झाला. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी (२३ मार्च) डेव्हिड वॉर्नर आणि शाहीन आफ्रिदी यांच्याच एक मजेशीर घटना घडली, जो क्रिकेटविश्वास चर्चेचा विषय ठरला आहे. तसेच या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला.
झाले असे की, तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघाकडून दुसऱ्या डावात डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) ही सलामीवीरांची जोडी फलंदाजी करत होती. यावेळी दिवसाचे अखेरचे षटक पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) टाकत होता. त्याने या षटकाचा आणि तिसऱ्या दिवसाचा अखेरचा चेंडू टाकला, ज्यावर वॉर्नरने रक्षात्मक शॉट खेळला.
पण, त्यानंतर गोलंदाज शाहीन आफ्रिदी पळत वॉर्नरच्या जवळ गेला. यावेळी वॉर्नरही त्याच्या अगदी जवळ जात त्याला भिडला. त्यानंतर दोन्ही खेळाडू मजेने एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून एकमेकांना खुन्नस देताना दिसले. यानंतर दोघेही हसून बाजूला गेले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
What a way to conclude the day 😄 #BoysReadyHain l #PAKvAUS pic.twitter.com/FafG8lkVTT
— Pakistan Cricket (@TheRealPCB) March 23, 2022
सामन्यात ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व
पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) तिसऱ्या कसोटीत (3rd Test) तिसऱ्या दिवसाखेरपर्यंत ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व दिसून आले. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात पहिल्या डावात १० बाद ३९१ धावा धावा केल्या. त्यांच्याकडून उस्मान ख्वाजा (९१), स्टीव्ह स्मिथ (५९), कॅमेरॉन ग्रीन (७९) आणि ऍलेक्स कॅरे (६७) यांनी अर्धशतके झळकावली. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाहने प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या.
यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या पाकिस्तानचा पहिला डाव २६८ धावांवर संपूष्टात आला. पाकिस्तानकडून अजर अली (७८), अब्दुल्लाह शफिक (८१) आणि कर्णधार बाबर आझम (६७) यांनी अर्धशतके झळकावली. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्सने ५ विकेट्स आणि मिशेल स्टार्कने ४ विकेट्स घेतल्या. तसेच ऑस्ट्रेलियाने १२३ धावांची आघाडी घेतली.
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाखेर ३ षटकात बिनबाद ११ धावा केल्या. तिसऱ्या दिवसाखेर वॉर्नर ४ आणि ख्वाजा ७ धावांवर नाबाद आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पंत आणि धोनीच्या तुलनेवर शेन वॉटसनची महत्त्वाची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘या’ बाबतीत दोघेही एकसारखे
मुंबईची सलामी जोडी ते सूर्यकुमारची उपलब्धता, रोहितने आगामी आयपीएलबद्दल दिली महत्त्वाची माहिती
अर्रर्र! झेल घेण्यासाठी धावलेल्या राणा अन् पूजाची जोरदार टक्कर, पुढं जे झालं ते पाहा व्हिडिओत