---Advertisement---

टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय! ख्रिसमसच्या दिवशी कसोटी जिंकणारा भारत केवळ तिसराच संघ, उर्वरित दोन..

Team India
---Advertisement---

वर्ष 2022 संपायला आले आणि भारताने मालिका जिंकत इतिहास रचला आहे. रविवारी (25 डिसेंबर)भारताने बांगलादेशला दुसऱ्या कसोटी सामन्यात 3 विकेट्सने पराभूत केले. मीरपूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताला विजयासाठी 145 धावा करायच्या होत्या, मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना पाहुणा संघ अडखळताना दिसला. या सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने 49 षटकात 7 विकेट्स गमावत हा विजय मिळवला आणि एक अनोख्या ऐतिहासिक विक्रमाची नोंद केली.

25 डिसेंबरला जगभरात ख्रिसमस सण साजरा केला जातो. याच दिवशी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात केवळ दोनच संघाना कसोटी सामने जिंकता आले होते. आता त्यामध्ये भारताचा देखील समावेश झाला आहे. यामुळे ख्रिसमसच्या दिवशी कसोटी सामना जिंकणारा भारत तिसराच संघ ठरला आहे. यातील पहिला विजय वेस्ट इंडिजच्या नावावर आहे. त्यांनी 1951मध्ये ऑस्ट्रेलियाला ऍडलेडमध्ये 6 विकेट्सने पराभूत केले होते.

वेस्ट इंडिजनंतर इंग्लंडने ख्रिसमसच्या दिवशी कसोटी सामना जिंकण्याचा पराक्रम केला. 1972मध्ये दिल्लीत झालेल्या त्या सामन्यात इंग्लंडने भारताला 6 विकेट्सने पराभूत केले होते. आता भारताने 50 वर्षानंतर ख्रिसमसच्या दिवशी विजय मिळवत तिसरा संघ होण्याचा मान मिळवला आहे.

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत जेव्हा भारत विजयाचा पाठलाग करत होता तेव्हा शुबमन गिल 7 धावा, केएल राहुल 2 धावा, चेतेश्वर पुजारा 6 धावा आणि विराट कोहली (Virat Kohli) 1 धावा अशा खेळी करत बाद झाले. त्यानंतर रिषभ पंत (Rishabh Pant) देखील 9 धावा करत तंबूत परतला. यामुळे भारत हरतो की काय अशी भीती निर्माण झाली होती. अशा स्थितीत श्रेयस अय्यर आणि आर अश्विन यांनी आठव्या विकेटसाठी नाबाद 71 धावांची भागीदारी केली. यावेळी अय्यरने 26 आणि अश्विनने 42 धावा केल्या. या सामन्यात अश्विनने विजयी धाव घेतली. त्याने चौकार मारत भारताचा विजय पक्का केला.

या मालिकेत भारत केएल राहुल याच्या नेतृत्वाखाली खेळला. बांगलादेशविरुद्ध भारत पहिल्या कसोटी 188 धावांनी जिंकली होती. आता या मालिका विजयामुळे भारताच्या आयसीसी कसोटी चॅम्पियनशीप 2021-23च्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा आशा वाढल्या आहेत. India became only the third team to win a Test on Christmas Day

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
या सम हाच! विरोधी खेळाडूचे कौतुक करत विराटने गिफ्ट केली स्वतःची जर्सी; सर्वत्र होतेय कौतुक
अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनमध्ये भारत खेळणार? ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका ठरणार निर्णायक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---