चेक प्रजासत्ताकची टेनिसपटू बार्बरा क्रेचीकोवाने आज लाल मातीवर इतिहास घडवला. फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या आज खेळवल्या गेलेल्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत तिने रशियाची टेनिसपटू अनास्ताशिया पावलूचेंकोव्हा तीन सेटमध्ये पराभव केला. एक तास ५८ मिनिटे चाललेल्या या सामन्यात बार्बरा क्रेचीकोवाने ६-१, २-६, ६-४ असा विजय मिळविला. हे तिचे पहिलेच फ्रेंच ओपन आणि पहिलेच ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरले.
अनास्ताशिया पावलूचेंकोव्हाचा हा पाचवा ग्रँडस्लॅम स्पर्धेचा अंतिम सामना होता. मात्र दुर्दैवाने तिला यात पराभव पत्करावा लागला. तर दुसरीकडे बार्बरा क्रेचीकोवाच्या कारकिर्दीतील एकेरीतील हे दुसरे डब्लूटीए विजेतेपद पटकावले. याचवर्षी मागील महिन्यात फ्रान्सच्या स्ट्रासबर्ग येथे तिने विजेतेपद पटकावले होते. तर तिच्या निमित्ताने सलग सहाव्या वर्षी फ्रेंच ओपनला महिला एकेरीत नवा विजेता मिळाला.
First Kiss 😘#RolandGarros | @BKrejcikova pic.twitter.com/lYBFblTWtZ
— Roland-Garros (@rolandgarros) June 12, 2021
रंगतदार झाला सामना
रोलॅंड गॅरोसच्या लाल मातीवर महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात प्रेक्षकांना रंगतदार खेळाची अनुभूती मिळाली. बार्बरा क्रेचीकोवा आणि अनास्ताशिया पावलूचेंकोव्हा या दोघींनीही अतिशय कडवी लढत दिली. पहिला सेट बार्बरा क्रेचीकोवाने ६-१ असा सहज खिशात घातला. मात्र पावलूचेंकोव्हा पुढच्याच सेटमध्ये जोरदार पुनरागमन करत तो सेट ६-२ असा आपल्या नावे केला. यामुळे तिसर्या सेटची उत्सुकता चांगलीच ताणल्या गेली होती.
तिसर्या सेटमध्ये दोन्हीही खेळाडूंनी तोडीस तोड खेळ केला. एकावेळी ३-३ असा हा सेट बरोबरीत होता. मात्र २५ वर्षीय क्रेचीकोवाने त्यानंतर सर्विसब्रेक मिळवला. आणि त्यानंतर मागे वळून न पाहता सेट, सामना आणि स्पर्धेचे विजेतेपद देखील आपल्या नावे केले.
महत्त्वाच्या बातम्या –
तब्बल १०१ च्या सरासरीने धावा फटकावणारा WTC Final मध्ये ठरू शकतो भारतासाठी डोकेदुखी
भारतीय संघ खेळतोय आपापसात सराव सामना, पहिल्या दिवशी ‘या’ खेळाडूंनी दाखवली चमक
व्हिडिओ: WTC फायनलसाठी कोहलीची ‘विराट’ तयारी, ‘या’ फटक्यांचा करतोय खास सराव