ला लीगाचा गेम वीक २५ चे काही महत्वपूर्ण संघांचे सामने नुकतेच पार पडले. युसीएलच्या पहिल्या लेग नंतरच्या झालेल्या सामन्यात रियल मॅड्रिड आणि एफसी बार्सेलोना संघांनी विजय मिळवत ३ गुण मिळवले. लीग मध्ये मॅड्रिड तिसऱ्या स्थानावरील ॲटलेटिको डी मॅड्रिडचा आज सामना आहे.
त्यापूर्वी रियल मॅड्रिड आणि डिपोर्टिओ ॲल्वेसच्या झालेल्या सामन्यात पहिल्या हाफची सुरुवात संथ झाली. पहिल्या हाफच्या शेवटच्या मिनिटात बेन्झेमाच्या असिस्टवर रोनाल्डोने डाव्या कोपर्यात बाॅल मारत पहिला गोल केला. दूसर्या हाफच्या पहिल्याच मिनिटला पुन्हा एकदा बेन्झेनाच्या असिस्टवर गॅरथ बेलने गोल करत सामन्यात २-० ची आघाडी घेतली.
६१ व्या मिनिटला गोल करत रोनाल्डोने दूसरा तर संघासाठीचा तिसरा गोल केला. सामना शेवटच्या काही मिनिटात असताना ॲल्वसने पेनल्टी बाॅक्समध्ये बेलवर फाऊल करत मॅड्रिडला पेनल्टी मिळवून दिली. कारकिर्दितली ५० वी हॅट्रिक होत असताना सुद्धा रोनाल्डोने पेनल्टी कीक बेन्झेमाला दिली आणि त्याचे रूपांतर गोलमध्ये करत बेन्झेमाने सामना ४-० असा जिंकण्यास योगदान दिले.
मागील सहा लीगा सामन्यात रोनाल्डोच्या नावावर १० गोल्स आणि २ असिस्ट आहेत. कालच १७ वर्षाआधी रोनाल्डोने पोर्तुगालच्या संघासाठी पहिला सामना खेळला होता.
तर दूसरीकडे रात्री झालेल्या सामन्यात बार्सेलोनाने जिरोनाचा ६-१ ने धुव्वा उडवला. जिरोनाचा हा बार्सेलोनाच्या घरच्या मैदानावरचा पहिला सामना होता आणि सामन्याच्या तिसर्याच मिनिटला उमतीती कडून झालेल्या चुकीचा फायदा ऊचलत जिरोनाने गोल करत सगळ्यांना चकीत केले. अवघ्या २ मिनिट नंतर मेस्सीच्या असिस्टवर सुवारेजने गोल करत सामना १-१ ने बरोबरीत आणला.
सामन्याच्या अर्ध्या तासानंतर सुवारेजच्या असिस्टवर मेस्सीने तीन डिफेंडर्समधून बाॅल काढत गोल करून सामन्यात आघाडी घेतली. ३५ व्या मिनिटला सुवारेजवर झालेल्या फाऊलने बार्सेलोनाला फ्रीकीक मिळाली. ३६ व्या मिनिटला मेस्सीने फ्रीकीक डिफेंडर्सच्या पायाखालून काढत गोल केला आणि सामन्यात ३-१ ची आघाडी घेतली.
४४ व्या मिनिटला काॅटिन्होने सुवारेजला असिस्ट करत पहिला हाफ ४-१ ने समाप्त केला. दूसर्या हाफमध्ये सुवारेचने बाॅल काॅटिन्होकडे दिला आणि त्याने त्याच्या उजव्या पायाने बाॅक्स बाहेरून बाॅल मारत ला लीगामध्ये बार्सेलोनातर्फे पहिला गोल केला. ७६ व्या मिनिटला उजव्या बाजूने आलेल्या डेम्पेलेच्या क्राॅसला दिशा दाखवत सुवारेजने हॅट्रिक नोंदवली आणि बार्सेलोनाला ६-१ ची अजेय बढत मिळवून दिली.
काल पहिल्यांदाच बार्सेलोनाच्या मेस्सी, सुवारेज, डेम्बेले आणि काॅटिन्होने एकत्र सामन्यात सुरुवात केली.
कालच्या सामन्यात झालेले काही विक्रम खालील प्रमाणे:-
# कालच्या विजयानंतर बार्सेलोना ३२ सामन्यापासून ला लीगामध्ये अपराजित आहेत.
# मेस्सीच्या कालच्या असिस्ट बरोबरच ला लीगामध्ये सर्वाधिक (१४८) असिस्टचा विक्रम आपल्या नावे केला. सर्वाधिक गोल्सचा (३६९) विक्रम सुद्धा मेस्सीच्याच नावे आहे.
# जिरोना विरुद्धच्या गोलनंतर मेस्सीने सर्वाधिक ३६ ला लीगाच्या संघांविरुद्ध गोल्सचा विक्रम आपल्या नावे केला.
# या मौसमात एकाच सामन्यात पाच गोल्सचा भाग असलेला सुवारेज पहिला खेळाडू ठरला.