बार्सिलोना (स्पेन)। अर्जेंटिना आणि बार्सिलोना क्लबचा स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सीने विक्रमी पाचवा युरोपियन गोल्डन शूज मिळवला आहे. यावेळी मेस्सीने पोर्तुगल आणि युवेंट्सचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डोला मागे टाकले आहे.
रोनाल्डोला 2007-08, 2010-11, 2013-14 (लुइस सुआरेज सोबत) आणि 2014-15 यावेळी हा पुरस्कार मिळाला आहे.
युरोप सॉकर लीगमध्ये सर्वाधिक गोल केल्याने त्याला हा पुरस्कार मिळाला आहे. आतापर्यत कोणत्याच फुटबॉलपटूला हा पुरस्कार पाच किंवा पाच पेक्षा अधिक वेळा मिळाला नाही.
स्पॅनिश लीगमध्ये संघाला विजेतेपद जिंकून देताना मेस्सीने ला लीगामध्ये 36 सामन्यात 34 गोल केले. तर लीव्हरपूलचा मोहमद सालाह हा 32 गोल करत सर्वाधिक गोल करणाऱ्यामध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.
याआधी मेस्सीने 2009-10(34 गोल), 2011-12 (50 गोल), 2012-13 (46 ), 2016-17 (37) असे चार गोल्डन बूट पटकावला आहे.
अर्जेंटिनाचा हा स्टार फॉरवर्ड युरोपा लीगमध्ये 14 गोल करत अव्वल स्थानावर असून यामुळे तो सहावा गोल्डन शूजचा मानकरी ठरू शकतो. बार्सिलोनाकडून 655 गेम्समध्ये खेळताना मेस्सीने सर्वाधिक 572 गोल केले आहेत.
मेस्सीचा संघहकारी लुइस सुआरेजने गोल्डन शूज दोन वेळ मिळवला आहे. त्याने 2013-14ला लीव्हरपूलकडून खेळताना तर 2015-16ला बार्सिलोनाकडून खेळताना मिळवला आहे.
प्रीमियर लीगमध्ये टोटेनहॅम हॉट्स्परचा हॅरी केन 30 गोलसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर रोनाल्डो 27 सामन्यात 26 गोलसह चौथ्या स्थानावर आहे.
गोल्डन बूट हा युरोपियन स्पोर्ट्स मिडीयाकडून दिला जातो.
🔥 Leo #Messi🔥
🐐 Record 5th #GoldenShoe
🏆👟 2009/10 👉⚽ 34 goals
🏆👟 2011/12 👉⚽ 50 goals
🏆👟 2012/13 👉⚽ 46 goals
🏆👟 2016/17 👉⚽ 37 goals
🏆👟 2017/18 👉⚽ 34 goals pic.twitter.com/3zL8fsGSgx— FC Barcelona (@FCBarcelona) December 18, 2018
महत्त्वाच्या बातम्या:
–करोडपती जयदेव उनाडकतने नक्की जादू-टोना केला असणार
–मॅंचेस्टर युनायटेडचे मॅनेजर होसे मरिनोची पदावरुन गच्छंती