---Advertisement---

आज रंगणार वर्षातील सर्वात मोठा फुटबॉल सामना; रियाल माद्रिद आणि बार्सिलोना येणार आमने-सामने

On: शनिवार, ऑक्टोबर 24, 2020 4:11 PM
---Advertisement---

फुटबॉल विश्वातील सर्वधिक प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या, रियाल माद्रिद एफसी विरुद्ध बार्सिलोना एफसी यांच्यातील सामना अर्थातच ‘एल क्लासिको’ आज(२४ ऑक्टोबर) खेळला जाणार आहे. बार्सिलोनाचे घरचे मैदान असलेल्या नोऊ स्टेडियमवर, भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७:३० पासून सामन्याला सुरुवात होईल. फुटबॉलप्रेमींना हा सामना ला लीगाच्या अधिकृत फेसबुक पेजवर पाहण्यास मिळेल.

मार्च महिन्यात झालेल्या, गेल्या हंगामातील दुसऱ्या ‘एल क्लासिको’ मध्ये रियाल माद्रिदने २-० ने विजय साजरा करत तीन अंकांची कमाई केली होती. रियल माद्रिदसाठी विनीशियस ज्यु. आणि मारियानो डायज यांनी गोल केले होते. दोन्ही संघातील पुढील ‘एल क्लासिको’ ११ एप्रिल रोजी रियाल माद्रिदच्या सॅंटियागो बेर्नानेबू या मैदानावर होईल.

हे असू शकतात संभावित ११

बार्सिलोना एफसी (४-२-३-१)

गोलकिपर :
नेतो

बचावपटू :
सर्जी रॉबर्टो
गेरार्ड पिक्यू
क्लेमेंट लॅन्गलेट
जॉर्डी अल्बा

मध्यरक्षक :
सर्जिओ बॉस्कोट्स
फ्रॅन्की डी जॉन्ग

आक्रमक :
अंतोनी ग्रिझमन
फिलीपे कुटीन्हो
अन्सु फाती

स्ट्रायकर:
लिओनेल मेस्सी (कर्णधार)

रियाल माद्रिद एफसी (४-३-१-२)

गोलकिपर:
थिबाऊस कोर्टोइस

बचावपटू :
नॅचो
राफाइल वराने
सर्जिओ रामोस (कर्णधार)
फर्लांड मेंडी

मध्यरक्षक :
फेडेरिको वाल्वर्डे
कॅसेमिरो
टोनी क्रुस

आक्रमक :
लुका मॉड्रीक

स्ट्रायकर :
करीम बेंझेमा
विनीशियस ज्यु.

महत्त्वाच्या बातम्या –

शेवटी ठरलं ! ‘या’ तारखेला होणारा आयएसएलचा शुभारंभ

शंभर वर्ष जुन्या क्लबने बदलले नाव आणि लोगो; ‘या’ नावाने सहभागी होणार आयएसएलमध्ये

भारतीय संघाचा ‘स्टार स्ट्रायकर’ मुंबई सिटी एफसीकडे ; प्रशिक्षक लोबेरो यांनी केली घोषणा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---