भारतीय संघाला इंग्लंड विरुद्ध झालेला पाचवा कसोटी सामना ७ विकेट्सने गमवावा लागला. एजबस्टन क्रिकेट ग्राउंड, बर्मिंघम येथे झालेल्या या सामन्यात भारताने पहिल्या डावात आघाडी घेतली होती. नंतर मात्र यजमान संघाने उल्लेखनीय खेळी करत संघाला सोपा विजय मिळवून दिला. या विजयामुळे पाच सामन्यांची कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत राहिली. यामुळे भारताचा विराट कोहली (Virat Kohli) सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होत आहे. याबाबतीत द बार्मी आर्मी हे ट्विटर पेजही मागे राहिले नाही.
झाले असे की, भारताने पहिल्या डावात ४१६ धावा केल्या होत्या. त्याच्या बदल्यात इंग्लंडने २८४ धावा केल्या होत्या. इंग्लंडच्या या पहिल्या डावात विराटने इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) याला डिवचले. नंतर पुढे जे झाले ते भारताच्या पराभवाचे मोठे कारण ठरले आहे. बेयरस्टोने या सामन्यात दोन्ही डावांमध्ये शतकी खेळी करत संघाच्या विजयात महत्वाची भुमिका पार पाडली आहे.
यावरून विराट सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होत आहे. यामध्ये द बार्मी आर्मी हे ट्विटर पेजही मागे राहिले नाही. त्यांनी विराटने बेयरस्टोकडे पाहून केलेल्या हावभावाचे फोटो ट्वीट करत त्याला ‘ कोहलीने १८ महिन्यात जेवढ्या धावा नाही केल्या त्यापेक्षा अधिक धावा बेयरस्टोने मागील २५ दिवसांत केल्या आहेत’, असे कॅप्शन दिले आहे. ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. त्यांनी बेयरस्टोने केलेल्या खेळीमुळे पेजचे नाव ‘जॉनी बेयरस्टोची बार्मी आर्मी’ असेही केले आहे.
Bairstow has scored more runs in the last 25 days than Kohli has in the last 18 months.#ENGvIND pic.twitter.com/RJ6QWAJFxL
— England's Barmy Army 🏴🎺 (@TheBarmyArmy) July 5, 2022
विराट मागील काही सामन्यांपासून धावा करण्यात मागे राहिला आहे. त्याला अजूनही फलंदाजीत लय सापडलेली नाही. मागील एक वर्षापासून त्याने १० कसोटी सामने खेळताना ५२७ धावा केल्या आहेत. त्यातील ७९ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. तर दुसरीकडे बेयरस्टो भलताच फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने मागील १३ कसोटी सामन्यांमध्ये १२१८ धावा करताना सहा शतकेही झळकावली आहेत. त्याने चार शतके मागील चार सामन्यात केली आहेत.
बेयरस्टोने इंग्लंडच्या दुसऱ्या डावात जो रुट (Joe Root) बरोबर २६९ धावांची भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला आहे. जो रुटनेही या डावात नाबाद १४२ धावांची खेळी केली आहे. पहिल्या डावात १०६ आणि दुसऱ्या डावात नाबाद ११४ धावा करणार बेयरस्टोला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. तर रुट आणि भारताचा या सामन्यासाठीचा कर्णधार जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांना मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महिला हॉकी विश्वचषक: वंदना कटारियाच्या गोलने भारत ‘सेफ झोन’मध्ये