कोरोना महामारीनंतर भारतातील पहिली क्रिकेट स्पर्धा म्हणून सुरू झालेली सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी तमिळनाडूने आपल्या नावे केली. बडोद्यावर ७ गड्यांनी मात करत तमिळनाडूने हे विजेतेपद मिळवले. युवा फिरकीपटू एम सिद्धार्थ तमिळनाडूच्या विजयाचा शिल्पकार ठरला. परंतु उपविजेता ठरलेल्या बडोदा संघाच्या सलामीवीर फलंदाज विष्णु सोलंकीने आपल्या जबरदस्त फटकेबाजीने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने सामन्यादरम्यान एक नव्हे तर दोनवेळा एमएस धोनी फेम हेलकॉप्टर शॉट मारला.
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत सोलंकीने डावातील अंतिम षटकापर्यंत टिकून फलंदाजी केली. यादरम्यान डावातील १९ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या सोनू यादवच्या गोलंदाजीवर त्याने दोनवेळा हेलिकॉप्टर शॉट मारला. १९व्या षटकातील तिसऱ्या आणि सहाव्या चेंडूवर हेलिकॉप्ट शॉट मारत दोन खणखणीत षटकार खेचले.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ट्विटरवर सोलंकीचा हेलिकॉप्टर शॉट मारतानाचा फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केला आहे. यावर क्रिकेट रसिकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे. अनेकांनी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार धोनी याच्या हेलिकॉप्टर शॉटची सोलंकीने कॉपी केल्याने त्याला चेन्नई संघात सहभागी करण्याची विनंती केली आहे. तर अनेकांनी सोलंकीच्या रुपात आयपीएलचा भावी सितारा मिळाला असल्याचे सांगितले आहे.
One batsman, two helicopter shots! 👍👍
Vishnu Solanki creamed two sixes off helicopter shots, one in the #QF3 against Haryana and one in the #Final against Tamil Nadu. 👌👌 @Paytm #SyedMushtaqAliT20 #TNvBDA
Watch both of those sixes here 🎥👇 https://t.co/jgO6quAaIB pic.twitter.com/pgmYr64ZNI
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 31, 2021
https://twitter.com/Karthikreddyyy/status/1355892976354951172?s=20
As perfect as it could be… A helicopter Hit from Vishnu Solanki for a 6⃣… He's doing it all alone for Baroda in the big final #SyedMushtaqAliT20
— Abhijeet ♞ (@TheYorkerBall) January 31, 2021
Gosh ,another helicopter 🚁🚁.Man this man ,Vishnu Solanki is gem 💎.
— Apar Sodhi (@VK18ADDICT) January 31, 2021
@msdhoni are you watching this Helicopter Hero called Vishnu Solanki?
— Murali Satagopan (@muralisatagopun) January 31, 2021
MEANWHILE : That Helicopter Shot. Phewww. Take a bow Vishnu Solanki. 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
— Cricket Anand 🏏 (@cricanandha) January 31, 2021
It is turning out to be a masterstroke to play M Siddharth in the final, he has finished Baroda – 4 wickets in 17 balls – Baroda 36 for 6 in the SMAT final.
— Johns. (@CricCrazyJohns) January 31, 2021
असा झाला थरारक अंतिम सामना
अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बडोद्याचा डाव १२० धावांवर आटोपला. तमिळनाडूचा युवा फिरकीपटू एम सिद्धार्थने आपल्या चार षटकांत २० धावा देऊन चार महत्वपूर्ण बळी मिळवले. बडोद्यासाठी विष्णू सोलंकीने सर्वाधिक ४९ धावा केल्या. ३६ धावांवर सहा गडी बाद झाल्यानंतर सोलंकी व अतीत सेठ यांनी सातव्या गड्यासाठी ५८ धावांची भागीदारी करत, बडोद्याला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.
तमिळनाडूला विजेतेपदासाठी प्रति षटक सहा धावा बनविण्याचे आव्हान होते. सलामीवीर हरी निशांत व कर्णधार दिनेश कार्तिक यांनी प्रत्येकी ३५ व २२ धावा करत सामना तमिळनाडूच्या बाजूने झूकता ठेवला. बाबा अपराजितने एक बाजू लावून धरत नाबाद २९ धावा फटकावल्या. शाहरुख खानने लुकमन मेरीवालाने टाकलेल्या १८ व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर चौकार वसूल करत तमिळनाडूला विजेतेपद मिळवून दिले. चार बळी मिळवणारा सिद्धार्थ सामनावीर ठरला.
महत्त्वाच्या बातम्या-
चेन्नई कसोटीसाठी दिग्गजाने निवडली टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन, ‘या’ अष्टपैलूला दिली संधी
व्हिडिओ: गोलंदाजाने टाकलेला चेंडू हवेतून सरळ यष्टीरक्षकाच्या हातात, बॉलिंग पाहून फलंदाजही अवाक्
कुलदीप यादवने गौतम गंभीरचे केले मनभरुन कौतुक; म्हणाला, ‘त्याने मला सर्वकाही…’