आजपासून(24 सप्टेंबर) सुरु झालेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू कृणाल पंड्या बडोदा संघाचे नेतृत्व करणार आहे. कृणाल नुकताच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पार पडलेल्या टी20 मालिकेत खेळला आहे. तसेच तो मागील अनेक टी20 मालिकांपासून भारताच्या टी20 संघाचा नियमित सदस्य आहे.
यावर्षीच्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये कृणालला कर्णधार करण्यात आलेल्या बडोदा संघाचे उपकर्णधारपद केदार देवधरकडे सोपवण्यात आले आहे. या संघात युसुफ पठाणचाही समावेश आहे. तर युवा अष्टपैलू क्रिकेटपटू दीपक हुडालाही या संघात संधी मिळाली आहे.
असे असले तरी हार्दिक पंड्याचा मात्र या संघात समावेश नाही. तो 2 ऑक्टोबरपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेत खेळणार असल्याने त्याचा बडोदा संघात समावेश करण्यात आले नसल्याची शक्यता आहे.
ही विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा 25 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे. या स्पर्धेत बडोदा संघाचा समावेश ब गटात करण्यात आला आहे. त्यांचा पहिला सामना आज ओडिसा विरुद्ध होणार होता. मात्र पावसामुळे मैदान ओले झाल्याने नाणेफेकही न होता सामना रद्द करण्यात आला आहे.
असा आहे विजय हजारे ट्रॉफीसाठी बडोदा संघ –
कृणाल पंड्या (कर्णधार), केदार देवधर (उपकर्णधार), रिषी आरोठे, दीपक हुडा, लुकमन मेरीवाला, मितेश पटेल, बाबाशफी पठाण, युसुफ पठाण, निनाद राठवा, विष्णू सोलंकी, सोयेब सोपारिया, स्वप्निल सिंग, आदित्य वाघमोडे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–२००७ टी२० विश्वचषकाच्या फायनलचा हिरो सध्या करतो काय?
–ती एक चूक विराट कोहलीला पडली महागात आयसीसीने सुनावली ही मोठी शिक्षा
–तो एक गोलंदाज ज्याने कोहलीला तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये केले आहे नको नको