बडोदा क्रिकेट असोसिएशनने काल (१५ एप्रिल) माहिती दिली की, प्रशिक्षक डेव्ह व्हॉटमोर हे आता भारताच्या देशांतर्गत बडोदा संघाला प्रशिक्षण देणार आहेत. वॉटमोर यांच्या प्रशिक्षणाखाली श्रीलंका संघ १९९६मध्ये विश्वचषक विजेता ठरला होता.
यावेळी बडोदा क्रिकेट असोसिएशनने (बीसीए) माहिती दिली की, असोसिएशनच्या काउंसिल सदस्यांनी व्हॉटमोर (Dav Whatmore) यांना बडोदा संघाचे प्रशिक्षक आणि मार्गदर्शक पद सोपवण्याची परवानगी दिली आहे. वॉटमोर यांना भारताच्या देशांतर्गत संघाला प्रशिक्षण देण्याचा अनुभवदेखील आहे. त्यांनी 2 वर्षे केरळ संघाला प्रशिक्षण दिले आहे.
बडोदाचे मुख्य प्रशिक्षक (Head Coach) आणि मार्गदर्शक पदासाठी व्हॉटमोर यांची निवड करण्यात आली आहे. असोसिएशनमध्ये अजूनही या विषयावर चर्चा चालू आहे. बीसीएने सांगितले आहे की, सर्व गोष्टी स्पष्ट झाल्यानंतर प्रशिक्षकाच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली जाईल.
व्हॉटमोर हे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू होते. त्यांनी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर अनेक परदेशी संघाना प्रशिक्षण दिले आहे. १९९० पासून त्यांनी प्रशिक्षकाचा पदभार सांभाळण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या प्रशिक्षणाखाली श्रीलंकाने १९९६ सालचा विश्वचषक जिंकला होता.
२००३ ते २००७ या काळात ते बांग्लादेश संघाचे प्रशिक्षक होते. त्यांच्या प्रशिक्षणाखालीच बांग्लादेशने २००७च्या विश्वचषकात भारताचा पराभव केला होता. एवढेच नाही तर, बांग्लादेशला त्यांचा २००५ सालचा पहिला कसोटी सामना जिंकण्यासही त्यांनी मदत केली होती.
व्हॉटमोर हे डिसेंबर २०१४मध्ये झिंबाब्वे संघाचे प्रशिक्षक होते. मात्र, २०१६च्या टी२० विश्वचषकात संघाने खराब कामगिरी केल्याने त्यांना प्रशिक्षकपदावरून काढून टाकण्यात आले होते.
ट्रेंडिंग घडामोडी-
-गर्लफ्रेंड की शेजारी? चहलच्या प्रश्नाने गोंधळला शमी
-वनडेत धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणारे ५ क्रिकेटर्स
-काय सांगता! कसोटीमध्ये चौथ्या डावात या ५ खेळाडूंनी केली आहे द्विशतके