---Advertisement---

ब्रेकिंग: महिला क्रिकेट संघाच्या बसचा अपघात; चार खेळाडू आणि मॅनेजर गंभीर जखमी

Mehardeep-Chhayakar
---Advertisement---

भारतीय क्रिकेट भारतातून एक धक्कादायक आणि चिंतेत वाढ करणारी बातमी येत आहे. विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या वरिष्ठ महिला टी20 क्रिकेट स्पर्धेवेळी बडोदा महिला क्रिकेट संघाच्या बसचा अपघात झाला असून, यात पाच जण गंभीर जखमी झाले आहे.‌

सध्या विशाखापट्टणम येथे वरिष्ठ महिला टी20 क्रिकेट स्पर्धा खेळली जातेय. शुक्रवारी (21 ऑक्टोबर) बडोदा महिला संघ आपला सराव संपवून जात असताना एका लॉरीची टीम बसला समोरच्या बाजूने धडक बसली. त्यामध्ये, संघाच्या चार खेळाडू आणि संघ व्यवस्थापक यांना दुखापत झाली आहे. हा अपघात विशाखापट्टणम जवळील ताथिचेटलापालम राष्ट्रीय महामार्गावर घडला.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले गेले असून, पाच जणांची प्रकृती काहीशी गंभीर आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
साधा सुधा नाय विश्वचषकातील दुसरा लांब षटकार हाय, ओडियन स्मिथच्या जबरदस्त शॉटने वेधले सर्वांचे लक्ष
गोळीच्या वेगाने चाललेला चेंडू पठ्ठ्याने झेलून दाखवला, पाहा टी20 विश्वचषकातील अफलातून कॅच

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---