fbpx
Sunday, January 17, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

६० च्या दशकातील वेस्ट इंडिज संघाचे संकटमोचक बसील बूचर

Basil Butcher the guyanese crisis man

September 3, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/ ICC

Photo Courtesy: Twitter/ ICC


७० च्या दशकात वेस्ट इंडिजने क्रिकेटवर राज्य केले होते. आपल्या तुफानी गोलंदाजांच्या व आक्रमक फलंदाजांच्या बळावर ते भल्याभल्यांना पाणी पाजत. मात्र, त्याआधी देखील वेस्ट इंडिजचा संघ इतकाच यशस्वी आणि धोकादायक होता. ६० च्या दशकात वेस्ट इंडिज संघात सर गारफिल्ड सोबर्स, फ्रँक वॉरेल, रोहन कन्हाय यांसारखे दिग्गज खेळाडू होते. या सर्वांसोबत एक फलंदाज वेस्ट इंडिज संघाचा संकटमोचक होता. नामवंत खेळाडू अपयशी ठरले तर हा खेळाडू नियमितपणे संघाला सावरत. तो खेळाडू म्हणजे बसील बूचर. आज बूचर यांचा जन्मदिवस.

बसील यांचा जन्म गयानामधील पोर्ट माऊरंट या खेडेगावात ३ सप्टेंबर १९३३ साली झाला. पोर्ट माऊरंट खेडेगाव असले तरी याच गावाने अल्विन कालिचरण, रोहन कन्हाय, जो सोलोमन यांसारखे क्रिकेटपटू जगाला दिले आहेत. इतर कॅरेबियन लोकांसारखे बसील हेसुद्धा क्रिकेट खेळत होते. आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीने त्यांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले.

१९५८-५९ च्या भारत दौऱ्यासाठी त्यांची वेस्ट इंडिज संघात निवड झाली. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर वेस हॉल यांच्यासमवेत त्यांनी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. पहिल्या सामन्यात त्यांनी २८ व नाबाद ६४ धावांची खेळी केली. दुसऱ्या डावात गॅरी सोबर्स यांच्यासमवेत त्यांनी १३४ धावांची भागीदारी केली. तो सामना अनिर्णित राहिला. त्याच मालिकेतील, ईडन गार्डन्सवरील तिसऱ्या व मद्रास येथील चौथ्या कसोटीत त्यांनी शतके झळकावली. संपूर्ण मालिकेत ६९.४२ च्या सरासरीने ४८६ धावा त्यांनी फटकावल्या.

त्यांनी १९६६ मध्ये ट्रेंटब्रिज येथे इंग्लंड विरुद्ध आपल्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च धावा केल्या. वेस्ट इंडिज पहिल्या डावात ९० धावांनी पिछाडीवर पडले असता, बुचर यांनी दुसर्‍या डावात, नाबाद २०९ धावांची जबरदस्त खेळी केली. सोबर्स यांच्या साथीने दोन तासांत १३३ धावांची भागीदारी त्यांनी केली. त्या सामन्यात वेस्ट इंडिजने १३९ धावांनी विजय मिळवला.

१९५८-१९६९ अशी अकरा वर्ष वेस्ट इंडिजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. यादरम्यान ४४ सामने खेळत त्यांनी ‌३,१०४ धावा केल्या. त्यात त्यांची सरासरी ४३.११ अशी राहिली. बूचर हे कामचलाऊ लेगस्पिन गोलंदाजी करत. त्यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत अवघे पाच बळी मिळवले. विशेष म्हणजे हे पाचही बळी त्यांनी एकाच डावात मिळवले होते.

ऑस्ट्रेलियाचे दिग्गज गोलंदाज रिची बेनो म्हणत,

“सोबर्स, कन्हाय, वॉरेल यांच्यापेक्षा बूचर यांना बाद करण्यासाठी आम्हा गोलंदाजांना अधिक कष्ट घ्यावे लागत.”

१६ डिसेंबर २०१९ मध्ये वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांचे फ्लोरिडा येथे वृद्धापकाळाने निधन झाले.

ट्रेंडिंग लेख-

-आजोबा, मुलगा व नातू अशा तीन पिढ्या क्रिकेट खेळलेल्या घरातील नातवाची गोष्ट

-किंग्ज इलेव्हन पंजाबचे हे ३ दिग्गज खेळाडू आयपीएलमध्ये झाले सुपर फ्लॉप

-तिशीतच आयर्लंडचा दिग्गज झालेला पॉल स्टर्लिंग

महत्त्वाच्या बातम्या-

-दिग्गजाने निवडले ५ भारतीय खेळाडू, जे घेऊ शकतात सुरेश रैनाची जागा

-सुरेश रैना आयपीएल खेळणार नसल्याची ‘या’ खेळाडूने केली होती सहा वर्षांपूर्वी भविष्यवाणी

-न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा निर्णय: ‘या’ दिग्गजाची प्रशिक्षकपदी पुनर्नियुक्ती


Previous Post

सुरेश रैना आयपीएल खेळणार नसल्याची ‘या’ खेळाडूने केली होती सहा वर्षांपूर्वी भविष्यवाणी

Next Post

चेन्नईच्या धोनीने ‘या’ विक्रमात टाकलंय मोठ-मोठ्या फलंदाजांना मागं, रोहित तर आसपासही नाही

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@MumbaiCityFC
टॉप बातम्या

आयएसएल २०२० : चुरशीच्या लढतीत मुंबई-हैदराबाद गोलशून्य बरोबरी

January 17, 2021
टॉप बातम्या

अबब! भारताने एकाच मालिकेत खेळवले तब्बल ‘इतके’ खेळाडू

January 17, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेपूर्वी मिसबाह-उल-हकने मांडले मत , म्हणाला आमचा संघ ‘या’ गोष्टीचा घेईल फायदा

January 17, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदरचे ‘या’ ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाने केले कौतुक, म्हणाले…

January 17, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

ब्रिस्बेन कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाला भोवल्या ‘या’ दोन चुका

January 17, 2021
Photo Courtesy: Twitter/@BCCI
टॉप बातम्या

रोहितच्या विकेटचे सोशल मिडीयावर उमटले पडसाद, ट्विटरवर ‘अशा’ आल्या प्रतिक्रिया

January 16, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ mipaltan

चेन्नईच्या धोनीने 'या' विक्रमात टाकलंय मोठ-मोठ्या फलंदाजांना मागं, रोहित तर आसपासही नाही

Photo Courtesy: Twitter/ IPL & Lionsdenkxip

अनुभवाची मोठी शिदोरी जवळ असलेल्या ५ शिलेदारांना यावेळी आयपीएलमध्ये मिळणार नाही संधी

Photo Courtesy: Twitter/CricketWorldCup

३ कट्टर मित्रांचा आयपीएलमध्ये युवराज कधीही झाला नाही टीममेट

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.