इंग्लंडविरुद्धच्या मुलतान कसोटीत बाबर आझमचा खराब फॉर्म पाहून बासित अलीच्या संयमाचा बांध फुटला आहे. त्यांने बाबर आझमला आता विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. बाबर आझमने शेवटचे कसोटी क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावून 18 डाव झाले आहेत. शेवटचे शतक त्याने डिसेंबर 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केले होते. त्यानंतर तो 50 धावांचा टप्पाही पार करू शकला नाही. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटीत त्याच्या संघाला त्याची सर्वाधिक गरज असताना पहिल्या डावात 71 चेंडूत 30 धावा आणि दुसऱ्या डावात 15 चेंडूत 5 धावा करून तो बाद झाला.
बाबर आझमची ही कामगिरी पाहून बासित अलीने त्यांच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, “बाबरला विश्रांतीची गरज आहे. मला विश्रांतीची गरज आहे. असे बाबरने सांगावे. त्याने चांगली कामगिरी करून 18 डाव झाले आहेत. दुसरा कोणी खेळाडू खेळत असता तर फवाद आलमप्रमाणे तीन सामन्यांनंतर संघाबाहेर झाला असता. बाबरने आपली भूमिका कमी करावी. आता हे खूप झाले आहे. सारे जग हसत आहे. कसे खेळावे कळत नाही का?”
पाकिस्तानने इंग्लंडविरुद्ध पहिल्या डावात 556 धावा केल्या होत्या. पण प्रत्युत्तरात इंग्लिश संघाने 823 धावा करत यजमानांना बॅकफूटवर टाकले. इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने त्रिशतक झळकावले. तर जो रूटने द्विशतक झळकावले.
चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्तानने दुसऱ्या डावात 6 गडी गमावून 152 धावा केल्या होत्या. संघ अजूनही इंग्लंडपेक्षा 115 धावा मागे होता. अबरार अहमदला तापामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे इंग्लंडला विजयासाठी फक्त तीन विकेट्सची गरज आहे. जे की पाहुण्या संघाने पाचव्या दिवशी मिळवल्या. या सोबतच इंग्लंडने ऐतिहासिका कसोटी सामना जिंकला.
यासोबत बासित अलीने पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदला डावाची सलामी देण्याचा सल्ला दिला आहे, तो म्हणतो की, जर तो सलामीवीर असेल तर सलामीच करावी. तो म्हणाला, “मी म्हणत होतो की शान हा सलामीचा फलंदाज आहे, त्याने डावाची सुरुवात करावी”.
हेही वाचा-
पाकिस्तानची घरच्या मैदानावर फजिती, पहिल्या डावात 556 धावा करूनही लाजिरवाणा पराभव
‘आम्हाला भीती नाही…’, भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी न्यूझीलंडच्या कर्णधाराने रणशिंग फुंकला…
झुडपांमध्ये चेंडू हरवला, शोधताशोधता दिग्गज खेळाडूची धडपड; पाहा मजेशीर VIDEO