श्रीलंकेने रविवारी (4 ऑगस्ट) दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा 32 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या पराभवासह भारतीय संघाचा श्रीलंकेविरुद्ध सलग 11 द्विपक्षीय मालिका जिंकण्याची मालिका जिंकली. या दोन्ही सामन्यात विराट कोहली हा पायचित (Virat Kohli LBW) झाला. त्यावर आता पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने प्रतिक्रिया दिली आहे.
दोन्ही सामन्यात भारतीय संघाला विजयाची संधी होती. विजयासाठी धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी दोन्ही सामन्यात सलामी दिलेली. मात्र, इतर फलंदाज लागोपाठ बाद झाल्याने भारतीय संघाला पराभूत व्हावे लागले. अनुभवी विराट कोहली (Virat Kohli) या दोन्ही सामन्यात विशेष योगदान न देता पायचित झाला.
त्याबद्दल बोलताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अली (Basit Ali) म्हणाला, “मला विचाराल तर मी सांगू शकतो की, विराट सातत्याने पायचीत का होत आहे? विराटने चांगल्या पद्धतीने सराव केलेला नाही. तो जगातील अव्वल फलंदाज आहे. केवळ कमी सरावानेच हे घडते. श्रेयस अय्यर किंवा शिवम दुबे अशा पद्धतीने बाद झाले असते तर, मी समजू शकलो असतो. श्रेयस आणि राहुल देखील इथे विना सराव करताच पोहोचले आहेत.”
विराट पहिला सामन्यात 24 तर दुसऱ्या सामन्यात 14 धावांवर बाद झाला आहे. विराट या मालिकेनंतर थेट बांगलादेशविरूद्ध खेळताना दिसेल.
दुसऱ्या सामन्यात भारतासमोर विजयासाठी 241 धावांचे आव्हान होते. मात्र हे आव्हान भारतासाठी खूप मोठे ठरले. भारतीय संघ 42.2 षटकांत 208 धावांत गारद झाला. श्रीलंकेकडून फिरकीपटू वेंडरसेने 33 धावांत 6 बळी घेतले. मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला होता. अखेरचा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचा भारतीय संघ प्रयत्न करेल. हा सामना बुधवारी (07 ऑगस्ट) कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पोलार्डनं ठोकला खतरनाक षटकार! समालोचन करणारा संगकारा थोडक्यात हुकला, पाहा VIDEO
बांगलादेशचा हिंदू क्रिकेटपटू लिटन दासचं आंदोलकांनी खरंच घर पेटवलं का? जाणून घ्या सत्य
आयपीएल 2025च्या हंगामात बदलणार 6 संघांचे कर्णधार?