---Advertisement---

पोलार्डनं ठोकला खतरनाक षटकार! समालोचन करणारा संगकारा थोडक्यात हुकला, पाहा VIDEO

On: मंगळवार, ऑगस्ट 6, 2024 5:50 PM
The Hundred
---Advertisement---

सध्या इंग्लंडमध्ये द हंड्रेड स्पर्धा (The Hundred League) खेळवली जात आहे. जगभरातील जवळपास सर्व मोठे टी20 क्रिकेटपटू द हंड्रेडमध्ये स्पर्धेत खेळतात. मात्र, दरम्यान वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज किरॉन पोलार्डचा (Kieron Pollard) व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. किरॉन पोलार्डनं (Kieron Pollard) असा षटकार मारला की, समालोचन करणारा कुमारा संगकारा थोडक्यात हुकला. त्यावेळी कुमारा संगकाराला बचावासाठी पटकन जागेवरुन उठावे लागले.

आता किरॉन पोलार्डनं (Kieron Pollard) मारलेल्या षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. द हंड्रेडनं त्यांच्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ झपाट्याने चर्चेत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स यावर सतत कमेंट करुन आपला फीडबॅक देत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये किराॅन पोलार्डनं खणखणीत षटकार ठोकला आणि चेंडू सरळ वेगानं समालोचकांच्या कॅबिनच्या दिशेनं गेला. सर्वजण उठून उभे राहिले आणि त्यांच्या चेहऱ्यावर भितीदायक चित्र निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.

या सामन्यात पोलार्डनं 12 चेंडूत 17 धावांची खेळी केली. किरॉन पोलार्डच्या संघ सदर्न ब्रेव्हनं निर्धाव 20 षटकांत 139 धावा केल्या. प्रत्युत्तरात वेल्श फायरचा संघ अवघ्या 97 धावांवर गारद झाला. त्यामुळं सदर्न ब्रेव्हनं वेल्श फायरचा 42 धावांच्या फरकानं पराभव केला. या विजयानंतर सदर्न ब्रेव्हनं गुणतालिकेत शीर्ष स्थान गाठलं आहे. आता त्यांचं 5 सामन्यात 8 गुण झाले आहेत. या स्पर्धेला (23 जुलै) रोजी सुरुवात झाली आहे. तर फायनल सामना (18 ऑगस्ट) रोजी होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएल 2025च्या हंगामात बदलणार 6 संघांचे कर्णधार?
विराट की बाबर कोण आहे उत्कृष्ट फलंदाज? ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाचे खळबळजनक वक्तव्य
1820 दिवसांनंतर तुटणार युनिव्हर्स बॉसचा मोठा विक्रम! रोहित शर्मा ठरणार अशी कामगिरी करणारा जगातील दुसरा फलंदाज 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---