बास्केटबॉल स्टार कोबी ब्रायंट आणि त्याची 13 वर्षीय मुलगी गियाना यांचा रविवारी हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. त्यांच्यासह या अपघातात एकूण 9 जणांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. दिग्गज कोबी ब्रायंटच्या निधनानंतर त्याच्या चाहत्यांसह संपूर्ण क्रीडा जगताला धक्का बसला आहे.
कोबी ब्रायंटच्या निधनानंतर क्रीडा जगतातून हळहळ व्यक्त होत आहे. अनेक खेळाडूंनी कोबी ब्रायंट तसेच त्याच्यासह त्याची मुलगी आणि या अपघातात मृत्यूमूखी पडलेल्या सर्वांना श्रद्धांजली वाहिली आहे. यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, स्पेनचा टेनिसस्टार राफेल नदाल, दिग्गज फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डोसह अनेक दिग्गज खेळाडूंनी सोशल मीडियावर पोस्ट करत हळहळ व्यक्त केली आहे.
विराटने इंस्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले आहे की ‘आज ही बातमी ऐकून धक्का बसला आहे. त्याच्याबद्दल(कोबी ब्रायंट) अनेक लहानपणीच्या आठवणी आहेत. बास्केटबॉल कोर्टवर त्याला खेळताना बघण्यासाठी सकाळी लवकर उठायचो. आयुष्य इतके अप्रत्याशित आणि चंचल आहे. या अपघातात त्याची मुलगी गियानाचेही निधन झाले. मला धक्का बसला आहे. त्याच्या आत्म्यास शांती मिळो. त्याच्या कुंटुंबाला शक्ती मिळो.’
https://www.instagram.com/p/B7zUprxF3nP/
तसेच नदालने ट्विट केला आहे की ‘जगातील सर्वात महान खेळाडूंपैकी एक असणाऱ्या कोबी ब्रायंटच्या मृत्यूची बातमी ऐकून मी आज सकाळी उठलो. कोबी ब्रायंट, त्याची मुलगी गियाना आणि इतर प्रवासी. त्याची पत्नी आणि कुटुंबीयांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. मला धक्का बसला आहे.’
https://twitter.com/RafaelNadal/status/1221583977917452289
त्याचबरोबर रोनाल्डोने ही बातमी ऐकून वाईट वाटल्याचे म्हणत ट्विट केले आहे की ‘कोबी आणि त्याची मुलगी गियाना यांच्या मृत्यूची बातमी ऐकून खूप वाईट वाटले. कोबी हा एक खरा दिग्गज होता आणि बर्याच जणांचा प्रेरणास्थान होता. त्याच्या कुंटुंबाला, मित्रांना आणि या अपघातात जीव गमावलेल्या सर्वांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सामील आहे.’
https://twitter.com/Cristiano/status/1221578681472163841
या खेळाडूंनीही वाहिली श्रद्धांजली –
https://twitter.com/sachin_rt/status/1221674741070565378
https://twitter.com/kaj33/status/1221543886767579136
https://twitter.com/PratimaSinghBB/status/1221653842502176769
https://twitter.com/virendersehwag/status/1221615381707493376
https://twitter.com/chetrisunil11/status/1221625758264614913
https://twitter.com/SDhawan25/status/1221667874894491648
https://twitter.com/Jaspritbumrah93/status/1221622983032107009
https://twitter.com/klrahul11/status/1221673523174731777
https://twitter.com/hardikpandya7/status/1221691687342198786
https://twitter.com/MariaSharapova/status/1221569870422138880
https://twitter.com/StefTsitsipas/status/1221616345307078656
https://twitter.com/CocoGauff/status/1221570921896374272
My heart truly mourns over the news today. Kobe was a great mentor and friend to me. You and your daughter will live forever in our hearts. There are not enough words to express my deepest sympathies to the Bryants and every family suffering from this tragedy. RIP my friend pic.twitter.com/VRmgaOaITT
— Novak Djokovic (@DjokerNole) January 27, 2020






