---Advertisement---

टी20 विश्वचषकातील आतापर्यंतचे शतकवीर; केवळ एका भारतीयाचा समावेश

---Advertisement---

क्रिकेट या खेळात कुठल्याही फलंदाजासाठी शतक झळकावणे खूप मोठी गोष्ट असते. हे कसोटी आणि वनडे स्वरूपात करणे तितकी अवघड नाही. परंतु गोष्ट जेव्हा टी२० क्रिकेटची येते, तेव्हा शतक झळकावणे थोडे कठीणच असते. कारण चेंडू कमी आणि दबाव खूप जास्त असतो. दरम्यान, विश्वचषक स्पर्धेत या दबावाचा स्तर आणखी उंचावलेला असतो. परंतु, असे काही फलंदाज आहेत ज्यांना टी२० विश्वचषक स्पर्धेत शतक पूर्ण करण्यात यश आले आहे. कोण आहेत ते फलंदाज चला जाणून घेऊया.

१)ख्रिस गेल – आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत सर्वात पहिले शतक ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेलने झळकावले होते. त्याने ११ सप्टेंबर २००७ मध्ये दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध हा कारनामा केला होता. त्याने ११७ धावांची तुफानी खेळी केली होती.

२)सुरेश रैना – भारतीय संघाचा माजी फलंदाज सुरेश रैना हा टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघासाठी शतक झळकावणारा एकमेव फलंदाज आहे. सुरेश रैनाने २०१० मध्ये झालेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ६० चेंडूंमध्ये १०१ धावांची खेळी केली होती.

३) माहेला जयवर्धने – २०१० मध्ये झालेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेत माहेला जयवर्धनेने झिम्बाब्वे संघाविरुद्ध शतक झळकावले होते. त्याने ६४ चेंडूंमध्ये १०० धावांची खेळी केली होती. या खेळीमध्ये त्यााने १० चौकार आणि चार षटकार ठोकलेले.

४)ब्रेंडन मॅक्यूलम – ब्रेंडन मॅक्यूलमने आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेतील चौथे शतक झळकावले होते. त्याने २०१२ मध्ये बांगलादेश संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात हा कारनामा केला होता. त्याने ५८ चेंडूंमध्ये १२३ धावांची खेळी केली होती.

५) ॲलेक्स हेल्स – इंग्लंड संघाचा विस्फोटक फलंदाज ॲलेक्स हेल्स याने २०१४ मध्ये झालेल्या आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत तुफानी शतक झळकावले होते. त्याने श्रीलंका संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ६४ चेंडूंमध्ये ११६ धावांची खेळी केली होती. या खेळी दरम्यान त्याने ११ चौकार आणि ४ षटकार मारले होते.

६)अहमद शहजाद – पाकिस्तान संघातील फलंदाज अहमद शहजाद याने २०१४ मध्ये झालेल्या आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत यजमान बांगलादेश संघाविरुद्ध शतक झळकावले होते. त्याने ६२ चेंडूंमध्ये १११ धावांची खेळी केली होती.

७) तमिम इक्बाल – बांगलादेश संघातील फलंदाज तमिम इक्बाल हा बांगलादेश संघासाठी टी२० विश्वचषक स्पर्धेत शतक झळकावणारा एकमेव फलंदाज आहे. त्याने २०१६ मध्ये ओमान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ६३ चेंडूंमध्ये १०३ धावांची खेळी केली होती.

८) ख्रिस गेल – ख्रिस गेल हा एकमेव खेळाडू आहे, ज्याने आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत दोन वेळेस शतक झळकावले आहे. त्याने दुसरे शतक २०१६ मध्ये इंग्लंड संघाविरुद्ध मुंबईच्या मैदानावर झळकावले होते. यादरम्यान त्याने ४८ चेंडूंमध्ये १०० धावांची खेळी केली होती.

९) जोस बटलर – टी२० विश्वचषकात शतक करणारा जोस बटलर हा इंग्लंडचा दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याने २०२१च्या टी२० विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध शारजाहच्या मैदानावर ६७ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकार मारत नाबाद १०१ धावा केल्या होत्या.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“कॅप्टन! मी उद्या वर्ल्डकप फायनल खेळणार आहे”, बोट तुटलेले असतानाही ‘तो’ मैदानात उतरला
आशिया चषक 2023 विषयी रॉजर बिन्नींची पहिली प्रतिक्रिया, दिसे स्पष्ट उत्तर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---