---Advertisement---

दुबईमध्ये हातात बॅट घेताच विराट कोहली घाबरला; जाणून घ्या काय होते कारण

On: सोमवार, ऑगस्ट 31, 2020 3:49 PM
---Advertisement---

मुंबई । इंडियन प्रीमियर लीग 2020 साठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने सराव सुरू केला आहे. दुबईमध्ये विराट कोहली अँड कंपनी प्रचंड मेहनत घेत आहे. स्वतः कर्णधार कोहली फलंदाजीचा सराव करताना दिसला. सरावानंतर कोहलीने धक्कादायक गोष्ट सांगितली आहे. विराट कोहली म्हणाला की, जेव्हा तो बॅट धरून नेटवर उतरला तेव्हा तो घाबरला. स्वत: विराट कोहलीनेही याचे कारणही सांगितले.

विराट कोहली फलंदाजी करताना भल्या-भल्या गोलंदाजांना घाम फोडतो. परंतु विराट कोहली ५ महिन्यांनंतर पहिल्यांदा नेट सेशनसाठी दुबईमध्ये उतरला तेव्हा तो घाबरला. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू फ्रँचायझीच्या संकेतस्थळानुसार कोहली म्हणाला, ‘खरे सांगायचे तर ते अपेक्षेपेक्षा खूप चांगले होते. मला थोडी भीती वाटली. मी पाच महिने बॅट हातात घेतली नव्हती, परंतु हो, मी विचार केला होता, त्यापेक्षाही सर्व चांगले होते.’

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या कर्णधाराने कोरोना व्हायरसमुळे पाच महिन्यांनंतर सरावास सुरुवात केली. नेट सेशनमध्ये दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेन आणि संघाचे संचालक माइक हेसन यांचा देखील समावेश होता.

आपल्या फिटनेस विषयी बोलतांना विराट म्हणाला, ‘लॉकडाऊन दरम्यान मी फिटनेसवर जोर दिला आहे, त्यामुळे मला खूप तंदुरुस्त वाटते आणि मला याची मदत होत आहे.  कारण तुमचे शरीर हलके असेल तर तुमची प्रतिक्रिया देखील चांगली येते, मला असे वाटते की बॉल खेळण्यासाठी माझ्याकडे पुरेसा वेळ आहे.  ही खूप चांगली गोष्ट आहे. शरीर जड जड वाटत असेल, शरीर इतके हालचाल करू शकत नाही. पण हो, मी म्हटल्याप्रमाणे सराव सत्र अपेक्षेपेक्षा खूप चांगले होते.’

गेल्या आठवड्यात आरसीबीची टीम दुबईला पोहोचली. क्वारंटाइनचा कालावधी संपल्यानंतर खेळाडूंनी शनिवारपासून नेटमध्ये सराव करण्यास सुरवात केली. कोहली व्यतिरिक्त युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर आणि शाहबाज नदीम आणि अन्य काही वेगवान गोलंदाजांनी फिरकी गोलंदाजांचा सराव केला.  पहिल्या सत्रानंतर कोहली आनंदी होता.

“पहिल्या दिवशी फिरकीपटू चांगले दिसले. त्यांनी सतत एकाच जागेवर चेंडू फेकले होते. शाहबाज आणि वॉशिंग्टनने चांगली गोलंदाजी केली. चहलची गोलंदाजीही मी पाहिली. वेगवान गोलंदाजांचा वेग इकडे तिकडे थोडा कमी पहायला मिळाला परंतु संघाच्या सरावाची सुरुवात चांगली झाली,” असल्याचे विराट कोहलीने सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या –

श्रेयस अय्यरने सांगितले हे काम केल्यावर दिल्ली कॅपिटलची टीम होणार चॅम्पियन

‘ही’ गोष्ट घडली नसती तर एमएस धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला नसता

असा साजरा केला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आईचा ८३ वा वाढदिवस

ट्रेंडिंग लेख –

वाढदिवस विशेष- भारताचा दिग्गज गोलंदाज जवागल श्रीनाथबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ

सुरैश रैनाऐवजी यंदा हे ३ खेळाडू बनू शकतात चेन्नई सुपर किंग्सचे उपकर्णधार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---