fbpx
Thursday, April 22, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सुरैश रैनाऐवजी यंदा हे ३ खेळाडू बनू शकतात चेन्नई सुपर किंग्सचे उपकर्णधार

August 30, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

१९ सप्टेंबरपासून युएईमध्ये आयपीएलच्या १३ व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. मात्र आयपीएल सुरु होण्याआधीच चेन्नई सुपर किंग्सला जबरदस्त धक्का बसला आहे. चेन्नईचा उपकर्णधार सुरेश रैना वैयक्तिक कारणामुळे या आयपीएल हंगामातून बाहेर पडला आहे. सीएसके व्यवस्थापनाने कालच ही बातमी ट्विटरद्वारे दिली.

रैना केवळ चेन्नईचा प्रमुख खेळाडूच नाही तर उपकर्णधार देखील होता. धोनीचा अनुपस्थिती त्याने अनेक वेळा चेन्नईचे कर्णधारपद यशस्वीरित्या सांभाळले आहे. आता रैना नसल्याने, उपकर्णधार पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणे महत्वाचे ठरेल.

आज आम्ही अशा तीन खेळाडूंविषयी तुम्हाला सांगणार आहोत जे कदाचित रैनाच्या जागी चेन्नई सुपर किंग्सचे उपकर्णधार बनू शकतील.

१) शेन वॉटसन

ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज अष्टपैलू शेन वॉटसन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. वॉटसन ३८ वर्षाचा झाला असला तरी तो अजूनही आयपीएलमध्ये खेळतो. २०१८ पासून तो चेन्नई संघाचा सदस्य आहे. तो या हंगामात चेन्नई सुपर किंग्जसाठी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. सलामीवीर तसेच गरज पडल्यास मध्यमगती गोलंदाजी करत संघाला विजयासाठी हातभार लावण्यात तो कसलीही कमतरता ठेवणार नाही.

शेन वॉटसनने सलग आठ वर्ष राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व केले होते. काही हंगामात त्याने राजस्थानच्या कर्णधारपदाची जबाबदारी देखील पार पाडली होती. २०१६-१७ या दोन आयपीएल हंगामात तो आरसीबी संघाचा सदस्य होता. वॉटसनकडे ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघाच्या कर्णधारपदाचा अनुभव देखील आहे. त्यामुळे, रैनाच्या जागी तो सीएसकेचा उपकर्णधार होऊ शकतो.

२) ड्वेन ब्रावो

टी२० क्रिकेटमधील सर्वात दिग्गज अष्टपैलू खेळाडू असलेला ड्वेन ब्रावो हा देखील चेन्नईच्या उपकर्णधार पदासाठी लायक उमेदवार आहे. ब्रावो २०११ पासून चेन्नई संघाचा प्रमुख खेळाडू आहे. काही दिवसांपूर्वीच टी२० क्रिकेटमध्ये ५०० बळी घेण्याचा विक्रम ब्रावोने आपल्या नावे केला आहे.

ब्रावो अनेक वर्ष वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा कर्णधार होता. ब्रावोच्या नेतृत्वात ट्रिबँगो नाईट रायडर्सने २०१८ कॅरिबियन प्रीमियर लीगचे विजेतेपद मिळवले होते. यापूर्वी ब्रावोने आयपीएल २००९ मध्ये मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधारपद देखील भूषवले आहे.

३) रवींद्र जडेजा

शेन वॉटसन व ड्वेन ब्रावो यांच्या व्यतिरिक्त भारतीय खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजा याच्यात चेन्नई सुपर किंग्जचा उपकर्णधार होण्याची पात्रता आहे. जडेजाला कप्तानीचा अनुभव नसला तरी धोनीचा विश्वासू म्हणून ही जबाबदारी मिळू शकते.

धोनीच्या नेतृत्वात जडेजा २०१२ सालापासून चेन्नई संघाचा सदस्य आहे. जडेजाकडे‌ आयपीएल तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. भविष्याचा विचार करता जडेजाकडे उपकर्णधारपद दिले गेल्यास आश्चर्य वाटायला नको.

ट्रेंडिंग लेख – 

आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई अडकलीय दुविधेत; पहा काय आहेत त्यामागील ३ कारणे

टी२० क्रिकेटमधील ‘या’ शानदार विक्रमात विराट कोहलीने टाकलंय रोहित शर्माला मागे, घ्या जाणून

वाढदिवस विशेष : विराट नसता तर बद्रीनाथ असता

महत्त्वाच्या बातम्या – 

दुबई पोहोचल्यानंतर सीएसकेच्या खेळाडूंनी ही गोष्ट केल्याने झाली कोरोनाची लागण?

जाणून घ्या सीएसकेचा फिरकीपटू हरभजन सिंग कधी होणार दुबईला रवाना

तब्बल ५ महिन्यांनतर मैदानात उतरल्याबद्दल कॅप्टन कोहली म्हणतो, असे वाटते की…


Previous Post

आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई अडकलीय दुविधेत; पहा काय आहेत त्यामागील ३ कारणे

Next Post

२०१४ मध्ये विराटला ४ वेळा बाद करणाऱ्या गोलंदाजाच्या विराटने ४ वर्षानंतर अशाप्रकारे केल्या होत्या बत्त्या गुल

Related Posts

Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

आठ वर्षात जमले नाही ते धोनीने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात केले, पाहा चक्रावून टाकणार रेकॉर्ड

April 22, 2021
Photo Courtesy: Facebook/IPL
IPL

मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! कोरोनातून सावरल्याने ‘हा’ सदस्य करणार पुनरागमन

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/@sportzhustle
IPL

आयपीएल २०२१ चा भावूक क्षण! रैनाने धरले भज्जीचे पाय, पाहा व्हिडिओ

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/@IPL
IPL

व्हिडिओ : वाईड म्हणून सोडला चेंडू आणि पायामागून झाला बोल्ड, रसेल झाला अजब पद्धतीने बाद

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/@IPL
IPL

सॅम करनच्या षटकात पॅट कमिन्सने चोपल्या तब्बल ३० धावा, पाहा डोळे दिपवणाऱ्या फटकेबाजीचा व्हिडिओ

April 22, 2021
Photo Courtesy: Screengrab/@Cricsphere
IPL

डेव्हिड वॉर्नरला बाद केल्यानंतर फेबियन एलनने केला अजब डान्स, पाहा भन्नाट व्हिडिओ

April 22, 2021
Next Post

२०१४ मध्ये विराटला ४ वेळा बाद करणाऱ्या गोलंदाजाच्या विराटने ४ वर्षानंतर अशाप्रकारे केल्या होत्या बत्त्या गुल

मोईन अलीला बाद करण्यासाठी रिझवानने वापरली ही आयडीया; म्हणाला, त्याला उर्दू येते...

आयपीएल २०२० मधून बाहेर पडलेल्या रैनाच्या जागी लागू शकते या खेळाडूंची सीएसकेमध्ये वर्णी

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.