---Advertisement---

धक्कादायक! एक धावेने अर्धशतक हुकले, फलंदाजाने क्षेत्ररक्षकाला बॅटने चोपले; अजूनही आहे कोमात

On: सोमवार, एप्रिल 5, 2021 11:20 AM
---Advertisement---

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, असे म्हटले जाते. कारण या खेळात कधी पासा पलटेल हे सांगाता येत नाही. तसेच क्रिकेट या खेळात अनेकदा अशाही घटना घडत असतात, ज्यामुळे मोठे वाद होतात. कधीकधी तर मैदानातच खेळाडूंमध्ये वाद सुरु होतात. अशीच एक धक्कादायक घटना क्रिकेटच्या मैदानावर घडली आहे. मध्यप्रदेशमध्ये एका क्रिकेट सामन्यात एका फलंदाजाने त्याचा झेल घेतला म्हणून क्षेत्ररक्षकाला बॅटने जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे.

ही घटना इंदोरमधील असून मेला ग्राऊंडवर घडली असल्याचे पोलीस अधीक्षक रामनरेश पचौरी यांनी सांगितले आहे.

झाले असे की फलंदाज संजय पालिया 49 धावांवर खेळत असताना त्याचा झेल सचिन पाराशरने घेतला. ज्यामुळे संजय बाद झाला. या झेलामुळे संजय इतका चिडला होता की त्याने 23 वर्षीय पाराशरला बॅटने मारहाण केली. ही मारहाण इतकी जबरदस्त होती की पाराशर मैदानाच बेशुद्ध झाला. त्याला या घडनेनंतर तात्काळ रुग्णालयात भरती करण्यात आले. त्याची अवस्था सध्या गंभीर आहे.

पोलीस अधीक्षक रामनरेश पचौरी यांनी घटनेबद्दल सविस्तर सांगताना असेही सांगितले की संजयला मारहाण करण्यापासून रोखण्यासाठी अन्य खेळाडूंनी प्रयत्न केले होते. पण त्यांना त्याला आवरता आले नाही. तसेच त्यांनी सांगितले की आरोपी सध्या घटनेनंतर फरार झाला असून पोलीस त्याचा तपास करत आहेत. त्याच्या नावावर हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

शार्दुल, नटराजन पाठोपाठ सिराजलाही आनंद महिंद्रा यांच खास गिफ्ट; घरी झालं महागड्या कारचं आगमन

आयपीएलमध्ये खेळलेले ५ वयस्कर खेळाडू; एक आहे तब्बल ४५ वर्षांचा

तब्बल सात वर्षांपुर्वी केलेला ट्विट आज धोनीला पडतोय महागात, सोशल मीडियावर चाहते विचारतायत…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---