आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे काही खेळाडू आहेत, जे आपल्या संघासाठी हुकुमी एक्के सिद्ध झाले आहेत. यात फलंदाज असो वा गोलंदाज, दोघांचाही समावेश असतो. जेव्हापासून टी20 क्रिकेट सुरू झाला आहे, तेव्हापासून फलंदाज हे विरोधी संघावर दबाव टाकत धावांचा डोंगर उभा करताना दिसत आहेत. हेच कारण आहे की फलंदाजांच्या नावावर सर्वात जास्त विक्रम असतात. फलंदाज हे फक्त धावांचा डोंगर उभा करत नाहीत तर चौकार आणि षटकारांचा धुरळाच उडवून टाकतात.
नुकत्यात झालेल्या आयपीएल स्पर्धेमध्ये षटकारांचा पाऊस पाडत रोहित शर्माने टी20 स्वरुपातील 400 षटकार लावण्याचा पराक्रम केला. हा भीमपराक्रम करणारे रोहित शर्मा हे पहिले भारतीय तर पाचवे आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. चला तर मग पाहूया असे सर्व खेळाडू, ज्यांनी हा भीमपराक्रम आपल्या नावे नोंदवून प्रेक्षकांची मने जिंकली आहे.
1) क्रिस गेल (1042 षटकार)
क्रिस गेल हा वेस्ट इंडीज संघाचा आक्रमक खेळाडू म्हणून नावाजलेला आहे. क्रिस गेलने टी20 क्रिकेटमध्ये 35 वेगवेगळ्या संघासाठी 448 टी20 सामने खेळले आहेत. त्यात 440 सामन्यात 22 शतके आणि 37 अर्धशतके मारून सर्वात जास्त म्हणजे 14276 धावांचा डोंगर उभा केला आहे. गेलने या सर्व सामन्यात 145.71 च्या स्ट्राईक रेटसोबत 36.79 सरासरीने धावा केल्या आहे. गेलने इतर कोणत्याही आंतरराष्ट्रीय खेळाडूच्या तुलनेत सर्वाधिक 1042 षटकार लगावले आहे. 2013 साली टी20 क्रिकेटमध्ये 175 धावा काढून सर्वाधिक वैयक्तिक धावांचा विश्वविक्रमही आपल्या नावे केला आहे.
2) ब्रेंडन मैकुलम (485 षटकार)
क्रिकेटच्या तिन्ही प्रारुपात आपल्या न्यूजीलंड संघासाठी आक्रमक फलंदाजी करत संघाला विजय मिळवून देणारे माजी कर्णधार ब्रेंडन मैकुलम यांनी आपल्या टी20 करियर मध्ये 16 संघासाठी प्रदर्शन केलेले आहे. बेंडन मैकुलम यांनी 370 टी20 सामन्यात प्रदर्शन केले आहे. ब्रेंडन मैकुलम यांनी 370 सामन्यात 136.49 च्या स्ट्राईक रेटने 29.97 ची सरासरी ठेवत 9922 धावा काढल्या. यात 485 षटकार आणि 929 चौकारांचा समावेश आहे. सोबत 55 अर्धशतक आणि 7 शतकांचा डोंगर उभा केला आहे.
3) शेन वॉटसन (467 षटकार)
ऑस्ट्रेलियाच्या या स्फोटक आणि आक्रमक फलंदाजीने आजवर बऱ्याच फ्रेंचायजी संघासाठी प्रदर्शन केले आहे. आजवर शेन वॉटसनने एकूण 343 टी20 क्रिकेट सामने खेळले आहेत. त्यापैकी 335 डावात फलंदाजी केली आहे. 335 सामन्यात 138.30 च्या स्ट्राईक रेट आणि 29.30 च्या सरासरीने अप्रतिम फलंदाजी प्रदर्शन केले आहे. शेन वॉटसनने 6 शतक आणि 53 अर्धशतके लावून नाबाद 124 धावांची सर्वोत्तम खेळी केली आहे. संपूर्ण कारकिर्दीमध्ये 785 चौकार आणि 467 षटकार आपल्या नावे केले आहेत.
4) एबी डिविलियर्स (436 षटकार)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघातील मधल्या फळीतील या खेळाडूने आजवर 30 पेक्षा जास्त देशी आणि परदेशी फ्रेंचाईजी संघासोबत खेळून आपल्या फलंदाजीचे प्रदर्शन केले आहे. एबी डिविलियर्स यांना क्रिकेटजगतात “मिस्टर 360” या नावाने ओळखले जाते. कारण एबी डिविलियर्स मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात चेंडू पोहचवणारा धडाकेबाज खेळाडू आहे. एबी डिविलियर्सने आजवर 340 टी20 सामने खेळेल आहे. त्यात 150.39 चा स्ट्राईक रेट आणि 37.32 च्या सरासरीने 9424 धावांचा डोंगर उभा केला आहे. त्यात 753 चौकार आणि 436 षटकारांचा समावेश आहे. त्याचा सर्वाधिक स्कोर 133 आहे.
5) रोहित शर्मा (400 षटकार)
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा एकमेव खेळाडू रोहित शर्मा याने आयपीएल 2021 च्या 51 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरोधात 2 षटकार लावून 400 षटकार पूर्ण केले. या स्फोटक खेळाडूने एकूण 356 टी20 सामने खेळले आहेत. त्यापैकी 343 सामन्यात 133.31 च्या स्ट्राईक रेट ने 31.95 ची सरासरी ठेऊन 9446 धावांचा डोंगर उभा केला. त्यात 6 शतक आणि 65 अर्धशतकांचा समावेश आहे. या धावांमध्ये त्याने 400 षटकार आणि 830 चौकरांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ ६ संघांचे कसोटी अन् मर्यादित षटकांचे आहेत वेगवेगळे कर्णधार, भारताची जोडी असेल सर्वात तगडी
गौतम गंभीर का ठरला टीम इंडियासाठी संकटमोचक, हे दाखवून देणाऱ्या ३ खेळी
भारतीयांसाठी ऐतिहासिक क्षण, जगातील सर्वात मोठ्या इमारतीवर झळकली टीम इंडियाची नवीकोरी जर्सी






