---Advertisement---

‘या’ ६ संघांचे कसोटी अन् मर्यादित षटकांचे आहेत वेगवेगळे कर्णधार, भारताची जोडी असेल सर्वात तगडी

On: गुरूवार, ऑक्टोबर 14, 2021 2:06 PM
Rohit-Sharma-and-Virat-Kohli
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघासाठी कसोटी आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये स्वतंत्र कर्णधार असावे अशी मागणी केली जात आहे. विराट कोहलीने टी२० विश्वचषकानंतर टी२० क्रिकेट संघाचे नेतृत्त्वपद सोडल्यानंतर रोहित शर्माला कर्णधार केलं जावं अशी मागणी होत आहे. रोहित शर्माला कर्णधार केलं जाईल याची सर्वात जास्त शक्यताही दिसते आहे. यावरुन असे दिसते की, पुढील काळात भारतीय संघ आणखी मजबूत होणार आहे.

केवळ भारतीय संघातच नव्हे, इतर संघातही कसोटी आणि वनडे व टी२० संघांचे नेतृत्त्वपद वाटले गेलेले आहे. या वेगवेगळ्या कर्णधारांच्या नेतृत्त्वाखाली हे संघही चांगले प्रदर्शन करताना दिसतात. अशाच स्वतंत्र्य कर्णदार असलेल्या संघाविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया असे काही संघ ज्यांच्याकडे कसोटी आणि एकदिवसीय व टी२० संघासाठी आहेत स्वतंत्र कर्णधार.

६) श्रीलंका (दिमुथ करूनारत्ने आणि दासनु शनाका)
श्रीलंकन संघ सध्या कठीण आव्हानांना झुंज देताना दिसतोय. त्यांचे काही खेळाडू फॉर्ममध्ये नाहीत आणि बरेच नवीन चेहरे संघात सामील झाले आहेत. हेच कारण आहे की श्रीलंकन संघाने या परिस्थितीचा सामना करण्यासाठी कसोटी आणि एकदिवसीय व टी२० संघासाठी स्वतंत्र कर्णधार नियुक्त केले आहेत.

श्रीलंकन कसोटी संघाच्या कर्णधारपदी दिमुथ करूनारत्ने असून त्याच्या नेतृत्वात संघाने १४ सामन्यात ५ विजय मिळवले आहेत. एकदिवसीय आणि टी२० सामन्यात कर्णधार पदी दासनु शनाकाच्या नेतृत्वाखाली ६ सामन्यात ३ विजय आणि ९ सामन्यात ५ विजय आपल्या नावे केले आहे.

५) वेस्ट इंडिज (क्रेग ब्रेथवेट आणि किरोन पोलार्ड)
एकदिवसीय क्रिकेट इतिहासातील प्रथम आणि द्वितीय दोन्ही विश्वचषक (१९७५-१९७९) जिंकणारा आणि २०१२ व २०१६ मध्ये टी२० विश्वविजेतेपद जिंकणारा वेस्ट इंडिज संघ सध्या खूप कठीण परिस्थितीतून जातोय. एकेकाळचा सर्वात बलवान संघ म्हणून ओळख असलेला वेस्ट इंडिज संघ आज खराब प्रदर्शनाच्या चक्रात अडकलेला आहे.

वेस्ट इंडिज संघाने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यासाठी स्वतंत्र कर्णधार नियुक्त केले आहे. कसोटी सामन्यात क्रेग ब्रेथवेटने १३ सामन्यात नेतृत्व केले असून ३ विजय मिळवले आहे. किरोन पोलार्डने टी२० सामन्यात नेतृत्व केले असून १२ सामन्यात विजय मिळवला आहे. टी२० क्रिकेटमध्ये पोलार्डने २६ सामन्यात नेतृत्व केले असून ९ विजय मिळवले आहे.

४) दक्षिण आफ्रिका (डीन एल्गर आणि टेम्बा बावूमा)
दक्षिण आफ्रिका संघ क्रिकेटविश्वात असा संघ आहे, ज्याने आजवर आयसीसीच्या कोणत्याही चषकावर आपले नाव कोरलेले नाही. म्हणून मोठ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाला “चोकर्स” म्हणून ओळखले जाते. कारण हा संघ प्रत्येकवेळी शानदार प्रदर्शन करतो मात्र महत्वाच्या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागतो.

आजवर फक्त चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात खेळणारा दक्षिण आफ्रिका संघ कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात स्वतंत्र कर्णधार खेळवत आहे. कसोटी सामन्यात (४ सामने/ ३ विजयी) आणि एकदिवसीय (३ सामने/३ विजय) डीन एल्गार  संघाचे नेतृत्व करत आहे . टी२० सामन्यात (७ सामने/ २ विजय) टेम्बा बावूमा याच्या नेतृत्वात संघ खेळत आहे.

३) इंग्लंड (जो रुट आणि ओएन मॉर्गन)
भारतीय संघासोबत नुकताच कसोटी सामना खेळलेला इंग्लंड संघ २०१९ चा विश्वचषक विजेता संघ आहे. इंग्लंडच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदी जो रुट असून त्याने आजवर ५६ सामन्यात संघाचे नेतृत्व केले आहे. त्यात २७ विजय आपल्या नावे केले आहे.
इंग्लंडच्या एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार ओएन मॉर्गन आहे, ज्याच्या नेतृत्वात संघाने ६४ टी२० सामन्यात आणि १२४ एकदिवसीय सामन्यात ७४ विजय मिळवले आहे.

२) ऑस्ट्रेलिया (टीम पेन आणि आरोन फिंच)
क्रिकेटविश्वात सर्वात बलवान संघ म्हणजे ऑस्ट्रेलिया. कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व टीम पेनकडे तर एकदिवसीय सामन्यात आरोन फिंचकडे. ऑस्ट्रेलियन संघाने टीम पेनच्या नेतृत्वात २३ कसोटी सामन्यात ११ विजय मिळवले आहे त्यासोबत एकदिवसीय आणि टी२० सामन्यात फिंचच्या नेतृत्वात २३ विजय मिळवले आहे.

१) भारत (विराट कोहली आणि रोहित शर्मा)
विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने ६५ सामन्यात ३८ विजय, टी२० सामन्यात ४५ सामन्यात २७ विजय, एकदिवसीय सामन्यात ९५ सामने आणि ६५ विजय आपल्या नावे नोंदवले आहेत. तरीसुद्धा आयसीसीच्या स्पर्धेमध्ये भारताच्या पदरी निराशा आली म्हणून भारतीय संघात २ कर्णधार असावे अशी मागणी होताना दिसत आहे. विराट कोहलीने टी२० कर्णधारपदावरून आपले नाव मागे घेतल्यावर कर्णधारपद रोहित शर्माकडे जाईल अशी शक्यता आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने आशिया चषक जिंकला आणि १० एकदिवसीय सामन्यात ८ विजय आणि टी२० सामन्यात १५ विजय मिळवले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

भारतीयांसाठी ऐतिहासिक क्षण, जगातील सर्वात मोठ्या इमारतीवर झळकली टीम इंडियाची नवीकोरी जर्सी

रिस्क है तो…! अश्विनच्या हॅट्रिकच्या चेंडूवर त्रिपाठीचा निर्भीड षटकार, बघा डोळ्यांचे पारणे फेडणारा व्हिडिओ

हे फक्त रिषभच करू शकतो! लाईव्ह सामन्यात पंतने चक्क अंपायरसोबत खेळला लपंडाव, तुम्हीही पाहा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---