इंग्लंड विरुद्ध न्यूझीलॅंड दुसऱ्या कसोटी सामन्यात आज पहिल्या दिवस अखेर इंग्लंडने ८ बाद २८० धावा केल्या आहेत. या डावात इंग्लंडकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत त्या जाॅनी बेअरस्ट्रोने.
त्याने १५४ चेंडूत नाबाद ९७ धावा करताना ११ चौकार आणि १ षटकार खेचला आहे. परंतु तो जेव्हा ५८ धावांवर खेळत होता तेव्हा काॅलीन डी ग्रमहोमच्या एका वेगवान बाउंसरने थेट बेअरस्ट्रोच्या हेल्मेटचा वेध घेतला.
हा बाउंसर इतका वेगवान होता की तो बेअरस्ट्रोच्या हेल्मेटला जेव्हा लागला त्यानंतर त्याचे हेल्मेट अक्षरश: हवेत उंच उडाले. थोडावेळ बेअरस्ट्रोलाही काय झाले हे समजले नाही.
जेव्हा हा प्रकार झाला तेव्हा इंग्लंडचा संघ ७ बाद २०५ अशा नाजूक अवस्थेत होता. परंतु त्या प्रकरणाचा कोणताही परिणाम आपल्या खेळीवर होवू न देता त्याने संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले.
पहा विडीओ:
Bouncer Knocks Off Bairstow's Helmethttps://t.co/N7wEj7ia7i
— Sharad Bodage (@SharadBodage) March 30, 2018