---Advertisement---

MPL 2025: चौके पे चौका! हे ठरलेले एमपीएल 2023 चे ‘चौकार’वीर

On: शुक्रवार, मे 23, 2025 6:25 PM
---Advertisement---

MPL 2025: महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2025) स्पर्धेचा तिसरा हंगाम 4 जूनपासून खेळला जाईल. महाराष्ट्र क्रिकेट संघटना या स्पर्धेचे आयोजन करते. षटकारांच क्रिकेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टी20 मध्ये असे अनेक फलंदाज आहेत जे चौकारांनी धावांचा डोंगर रचतात. एमपीएलच्या पहिल्या हंगामात काही खेळाडूंनी असे चौकार मारले होते. या पहिल्या हंगामात सर्वाधिक चौकार मारणाऱ्या टॉप तीन खेळाडूंबद्दल आपण माहिती घेऊया. (Most fours in mpl 2023)

पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाचा अनुभवी फलंदाज अंकित बावणे (Ankeet Bawne) हा निर्विवादपणे एमपीएल 2023 चा सर्वोत्तम फलंदाज होता. त्याने सर्वाधिक धावा बनवत ऑरेंज कॅप आपल्या नावे केली होती. यासोबतच फलंदाजीतील बहुतांशी विक्रम त्याच्याच नावे जमा झालेले. त्याने पहिल्या हंगामात सात सामने खेळताना 362 धावा केलेल्या. यामध्ये त्याने तब्बल 45 चौकार खेचलेले. अंकितने पहिल्या हंगामात दोन अर्धशतके व एक शतक देखील ठोकलेले.

ऋतुराज गायकवाड नेतृत्व करत असलेल्या पुणेरी बाप्पा संघाने पहिल्या हंगामात तिसऱ्या क्रमांकापर्यंत मजल मारलेली. त्यांच्या या यशात युवा सलामीवीर पवन शहा (Pavan Shah) याचे महत्त्वपूर्ण योगदान राहिलेले.‌ यश क्षीरसागर व ऋतुराज यांच्यासोबत मिळून त्याने संघाला नेहमीच चांगली सुरुवात दिली. त्याने पहिल्या हंगामात सात सामने खेळताना 182 धावा बनवलेल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 21 चौकार आले होते.

निवृत्त भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव (Kedar Jadhav) हा एमपीएलच्या पहिल्या हंगामात पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाचे नेतृत्व करत होता. त्याच्या नेतृत्वात संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचलेला. स्वतः केदारने उत्कृष्ट फलंदाजी या हंगामात करून दाखवलेली. त्याच्या बॅटमधून सात सामन्यात 198 धावा आलेल्या. यामध्ये 18 चौकार सामील होते.

रत्नागिरी जेट्स संघाचा धीरज फटांगरे (17 चौकार), नाशिकचा राहुल त्रिपाठी (15 चौकार), पुणेरी बाप्पाचा यश क्षीरसागर व छत्रपती संभाजी किंग्सचा मुर्तझा ट्रंकवाला (प्रत्येकी 14 चौकार) हे देखील 13 पेक्षा जास्त चौकार मारण्यात यशस्वी ठरले होते.

आमदार रोहित पवार (Rohit Pawar) एमसीए अध्यक्ष झाल्यानंतर, त्यांनी एमपीएलची कल्पना मांडली होती. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे, पुणे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 4 जून ते 24 जून या काळात ही स्पर्धा खेळली जाणार आहे. या स्पर्धेचे ओटीटी प्लॅटफॉर्मवरील लाईव्ह स्ट्रीमिंग JioHotstar वर होईल. चाहते टीव्हीवर Star Sports 2 चॅनेलवर हे सामने पाहू शकतात. मागील दोन वर्षाप्रमाणे यंदाही चाहत्यांना कोणत्याही मोफत स्टेडियममध्ये जाऊन सामने पाहण्याची व्यवस्था केली गेली आहे. (MPL 2025 Live Telecast On JioHotstar OTT And Star Sports 2 Tv Channel)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---