2023 वर्ष वनडे विश्वचषकाचे होते. एकूण 10 संघ वनडे विश्वचषक जिंकण्यासाठी या स्पर्धेत सहभागी झाले. यजमान भारतीय संघ विश्वचषकाच्या विजेतेपदासाठी दावेदार होता. पण भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. असे असले तरी भारतीय क्रिकेटपटूंचे प्रदर्शन सर्वोत्तम राहिले. आपण या लेखात अशाच पाच खेळाडूंवर नजर टाकणार आहोत, ज्यांनी वनडे क्रिकेटमध्ये 2023 वर्षात सर्वाधिक धावा केल्या.
5. पथून निसांका
श्रीलंकेचा हा प्रतिभाशाली फलंदाज 2023 मध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसला. त्याने खेळलेल्या 29 वनडे सामन्यांमध्ये 2 शतक आणि एकूण 9 अर्धशतकांच्या मदतीने 1151 धावा केल्या. 104 धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली. वर्षात सर्वाधिक वनडे धावा करणाऱ्यांच्या यादीत निसांका पाचव्या क्रमांकावर आहे.
4. डॅरिल मिचेल –
न्यूझीलंडचा स्टार अष्टपैलू या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने वर्षभरात एकूण 26 वनडे सामने खेळले. यात 5 शतक आणि 3 अर्धशतकांच्या मदतीने मिचेलने 1204 धावा केल्या. यादरम्यान 134 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या ठरली. विश्वचषक स्पर्धेत त्याने भारताविरुद्ध खेळताना दोन जबरदस्त शतके टोकली होती.
3. रोहित शर्मा –
भारतीय कर्णधार रोहित शर्मा याची बॅटही 2023मध्ये चांगलीच चालली. रोहित सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. सलामीवीर फलंदाजाने 27 वनडे सामन्यांमध्ये 2 शतक आणि 9 अर्धशतकांच्या मदतीने 1255 धावा केल्या. 131 ही त्याची वर्षातील सर्वोत्तम खेळी ठरली.
2. विराट कोहली –
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली यानेही 2023 चांगलाचे गाजवले. विराट वर्षात दुसरा सर्वाधिक वनडे धावा करणारा फलंदाज ठरला. वनडे विश्वचषक आणि त्याआधीच्या काही महत्वाच्या मालिकांमध्ये विराटची संघासाठी भूमिका महत्वाची ठरली. त्याने 27 सामन्यांमध्ये 6 शतक आणि 8 अर्धशतकांच्या मदतीने 1377 धावा केल्या आहेत. 166* ही त्याची सर्वोत्तम खेळी राहिली.
1. शुबमन गिल –
विश्वचषक स्पर्धेत शुबमन गिल याने आपल्या जबरदस्त प्रदर्शनाच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधले. याच प्रदर्शनामुळे गिल 2023 इतर कोणत्याही फलंदाजापेक्षा सर्वात जास्त धावा करू शकला. वर्षभरात त्याने एकूण 29 वनडे सामने खेळले आणि यात 1584 धावा कुटल्या. यात 5 शतक आणि 9 अर्धशतकांचा समावेश होता. 208* ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती.
(Batsmen with most ODI runs in 2023)
महत्वाच्या बातम्या –
18व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी कप क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत इन्फोसिस, टीसीएस संघांची विजयी सलामी
भारताची डोकेदुखी वाढली; दुसऱ्या कसोटीतून अष्टपैलू माघार घेण्याची शक्यात, सराव करताना दुखापत